कंधार : प्रतिनिधी
संत गाडगेबाबा शिक्षण संस्था कंधार संचालित महात्मा फुले विद्यालय नवा मोंढा कंधार येथे आनंदनगरी साजरी करण्यात आली व कार्यक्रम घेण्यात आला या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संत गाडगेबाबा शिक्षण संस्था कंधार चे सचिव चेतनभाऊ केंद्रे यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. दरम्यान प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्कूल डे स्वशासन दिन घेण्यात आला तसेच मैदानी खेळ मोठ्या आनंदाने संपन्न झाली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सर्व खेळाला इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक जे जी केंद्रे यांनी दिली.
शाळेचे जेष्ठ शिक्षक एच के केंद्रे, जि टी गुट्टे ,सी बी जाधव , फिरदोस शेख , के पी आगबोटे, व्ही डी चव्हाण , शेख जुनेद , देशमुख सर, आकाश सर, पी एस कागणे सर, सेवक इबू केंद्रे यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते.

