मृत्यू हा माणसाचा मित्र आहे.
तो केव्हा येईल हे आजतागायत कोणाला स्पष्ट सांगता आले नाही. कधी काळ येतो,तर वेळ येत नाही, कधी वेळ येते, तर काळ येत नाही. अशा घटना आपण अनेक ठिकाणी पाहिलेल्या आहेत. काही जण विमान अपघाता तून बालंबाल वाचले आहेत. तर काही अग्नि तांडवातून जीव वाचून बाहेर सही सलामत आले आहेत.सटवी नशीब लिहिते.आणि ते खरं घडते.असे म्हणतात.
हा जन्म मरणाचा फेरा असतो. त्यामध्ये वेळ आली की तो जातो.
मृत्यू हे जीवनाचं अंतिम आणि अटल सत्य आहे. तो कोणालाही कधीही, कुठेही आणि कसाही येईल याचा काहीही नेम नाही. आज सकाळी सकाळी हसत घराबाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी परत घरी येईल. की नाही याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. तरीही रोजच्या धावपळीत,ताण-तणावात,अपेक्षांच्या ओझ्या खाली राहत असतो. प्रत्येक व्यक्तीला उद्याची चिंता लागलेली असते.
भविष्याची भीती प्रत्येकाच्या मनात घर करून बसली आहे. आणि अजून आपण काहीतरी नवीन घेऊ.या विचारात आजचा क्षण हातातून निसटून जात आहे. दररोज कुठे तरी एखादी वाईट गोष्ट घडते. त्यामुळे आपण माणसाचा जीव हा पाण्यावरील बुडबुडा आहे.असे बोलतो. सोबत आपण काय घेऊन आलोत? जाते वेळेस काय घेऊन जाणार आहोत? असे सडेतोड विचार आपल्याला क्षणभर जागच्या जागी थांबवतात. मन सुन्न होतं,
आपले व इतरांचे डोळे पाणावतात आणि आयुष्य किती नाजूक व नीती किती निष्ठूर आहे. याची जाणीव होते. त्या वेळी लक्षात येतं की बडेजाव पणा, शेतीवाडी, पदवी, पैसा, पद, प्रतिष्ठा, सत्ता या सगळ्या गोष्टी जिथल्या तिथेच थांबतात. *मरावे परी कीर्ती रुपी उरावे* असे म्हणतात. माणूस किती श्रीमंत असो, गरीब असो, त्या माणसासोबत त्याने कमावलेलं प्रेम, आपुलकी,माणुसकी, आणि लोकांच्या मनात उरलेली त्या व्यक्ती बद्दलची कायमस्वरूपी आठवण असते. त्यासाठी सर्व बांधवांनी,तरुणांनी आपल्या नाते वाईका कडे दुर्लक्ष करू नका.
माता पिताशी, गुरुशी ,शेजाऱ्यांशी गोड बोला, जिवलग मित्रांपाशी अंतःकरणा तून मोकळं बोला.तुमच्या मनात इतरांबद्दल सहानुभूती असावी. मनात राग,मत्सर, द्वेष,खोटारडेपणा,अहंकार कोणाबद्दल करू नका.
मानव जातीला माफ करणं शिका,
कारण वेळ कोणासाठीही थांबत नाही. भौतिक सुख क्षणभर आहेत.
जगात सर्वत्र—सगळी मोहमाया पसरली आहे; पण समाधान,प्रेम आणि शांतता हीच खरी कमाई आहे.
उद्या काय होईल ? हे आपल्याला माहिती नाही,
पण आज आपल्या हातात वर्तमान आहे.म्हणून आजचा दिवस मनापासुन जगा,प्रामाणिकपणे जगा.
आज घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे त्याबद्दल दोन शब्द…
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे 22 जुलै 1959 रोजी झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण तेथेच झाले. आणि उच्च माध्यमिक शिक्षण मुंबई या ठिकाणी घेतले. देवळाली प्रवरा हे त्यांचे आजोंळ आहे .त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील ते आहेत. महाराष्ट्राचे कणखर,दमदार व्यक्तिमत्व आणि धुरंदर नेता म्हणजे अजित दादा पवार होय.
त्यांनी मोठमोठे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील कामे केली. वेगवेगळ्या संस्थांवर त्यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष ,सदस्य म्हणून ही कार्यभार सांभाळला. वेगवेगळ्या योजना महाराष्ट्रात उभ्या करून गोरगरीब, बेरोजगार, शेतकरी, मजूर ,कामगार,कलाकार,कारागीर यांना रोजगार मिळवून दिला.
आपल्या रोखठोक बोली भाषेमुळे ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते. त्यांना लोकांमध्ये जाऊन काम करण्याची आवड होती. सकाळी सहा पासून ते रात्री अकरा पर्यंत गोरगरीब जनतेच्या कामांसाठी वेगवेगळ्या योजना सफल करण्या साठी सारखं फिरत असत. अनेक वेळेस ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. सात वेळा ते विधानसभेचे आमदार होते. एक वेळेस बारामती मतदारसंघातून ते खासदारही झाले. प्रत्येक स्त्रीला समान हक्क देऊन त्या सुद्धा आपल्या बरोबर कार्य करू शकतात.याची जाणीव ठेवून त्यांनी *लाडकी बहीण योजना* आणली. त्यामुळे ते महाराष्ट्राच्या घराघरात आपल्या कार्य कर्तृत्वाने पोहोचले. पंढरीच्या वारीला जाऊन दर्शन घेऊन संत महात्म्यांच्या गाठीभेटी घेत असत.त्यांना वारकरी संप्रदाय मनापासून आवडत असे.भाविक भक्ताच्या पंगतीला बसून ते महाप्रसाद घेत असत. कार्तिकी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या महापूजेला जात असत.
महाराष्ट्र राज्य विकासाची भरारी घेण्यासाठी विठुरायाला साकडे घालत असत.कोणत्याही
सभेमध्ये बोलते वेळेस रोखठोक आणि डोळ्यांत डोळे घालून पाहत. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राज्यसभेवर खासदार म्हणून कार्य करीत आहेत. त्यांना पार्थ व जय अशी दोन मुले आहेत.लाखो महिलांना लाडकी बहीण योजना देऊन आशीर्वाद घेतलेले,समाजाची सेवा करणारे, चौफेर विकासाची गंगा नेणारे,अभ्यासू व्यक्तिमत्व,आदरयुक्त दरारा निर्माण करणारे महाराष्ट्रातील खंबीर नेतृत्व म्हणजेच अजित दादा पवार होत. 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी विमान अपघातात सहा व्यक्तीसह त्यांचा दुर्दैवी अंत झाला. ही काळीज फाटणारी घटना ऐकायला फार वाईट वाटले. अजित दादा पवार हे बोलायला फटकळ होते. परंतु निर्मळ मनाचा व्यक्तिमत्व आपल्या मधून कायमस्वरूपी निघून गेले.आणि संपूर्ण महाराष्ट्र नि:शब्द झाला. *चिट्ठी ना कोई संदेश,*जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गये*, म्हटल्यासारखे हे घडले. आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या महत्त्वाच्या निवडणुकांच्या सभेसाठी बारामतीत ते येत होते. त्यांच्या बारामतीत चार ठिकाणी सभा होणार होत्या.
हे सर्व खरं जरी असलं तरी ते आपल्यात आज नाहीत.
हे मात्र त्रिकाल सत्य आहे.महाराष्ट्राच्या राजकारणातून अचानक नाहीसे होणे म्हणजे हा धक्कादायक घटना अनेक जणांच्या जिव्हारी लागली आहे. ही घटना समजल्या बरोबर घटनास्थळी कार्यकर्त्यांनी फार मोठी गर्दी केली. मान्यवरांनी त्यांनी केलेल्या कार्याच्या घटना सांगत आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी दुःख व्यक्त करून सर्व शासकीय कार्यालयांचा झेंडा अर्ध्यावर उतरविला गेला आहे. आणि शासकीय दुःखवटा तीन दिवस पाळला जाणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. हा दुर्दैवी अंत होणे. ही चांगली गोष्ट नाही. त्यांच्या कुटुंबींयांना, कार्यकर्त्यांना, या दुःखातून सावरण्यासाठी परमेश्वर त्यांना बळ देवो.अध्यक्ष, विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेडच्या वतीने अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
*साहित्यिक: बरसमवाड विठ्ठल गणपतराव मुखेड*

