कंधार: (दिगांबर वाघमारे )
दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोज शनिवारी माजी जि.प.सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर यांचा वाढदिवसानिमित्त फुलवळ व फुलवळ ग्रामपंचायत अंतर्गत च्या अंगणवाडी मधील शिकणाऱ्या चिमुकल्यांना गणवेश वाटप व पोषण आहार वाटपाचे आयोजन करण्यात आले असून,या कार्यक्रमास अंगणवाडी मधील सर्व विद्यार्थी/ विद्यार्थिनी, अंगणवाडी ताई, मदतनीस,पालक व ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन सरपंच सौ.विमलबाई मंगनाळे यांनी केले आहे.
३१ जानेवारी हा माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्ष सौ.वर्षाताई संजय भोसीकर यांचा जन्मदिन असल्यामुळे या दिनाचे औचित्य साधून दि.३१ जानेवारी रोज शनिवारी सकाळी ११:०० वाजता श्री बसवेश्वर विद्यालय फुलवळ येथे फुलवळ व फुलवळ ग्रामपंचायत अंतर्गत सोमसवाडी, केवळा तांडा,महादेव तांडा येथील अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या चिमुकल्यांना भोसीकर कुटुंबियांच्या वतीने गणवेश वाटप व गोड पोषण आहार वाटप करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास अंगणवाडीतील सर्व विद्यार्थी/ विद्यार्थिनी, अंगणवाडी ताई, मदतनीस,पालक व ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून, कार्यक्रमाची शोभा वाढवावी.असे आवाहन सरपंच सौ.विमलबाई मंगनाळे यांनी केले आहे.
याप्रसंगी मान्यवर व फुलवळ सर्कल मधील प्रमुख कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे..!!

