कंधार ; प्रतिनिधी
मारतळा येथील रहिवासी सुरेश गंगाराम पवार व साहेबराव लालू गायकवाड रा. मारतळा ता.लोहा हे ऊसतोड कामगार असून ते मारोती चाफेकर यांचे भाचे व नातेवाईक आहेत. कामानिमित्त कर्नाटक ला जात असताना दि.९ नोव्हेंबर रोजी मुखेड तालुक्यातील मुक्रामाबाद जवळ अपघात होवून दोघांचे अपघाती दुःखद निधन झाले होते.
दि.१० रोजी त्यांच्या परिवाराचे सांत्वन सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी भेटदेवून सांत्वन केले .शासनाच्या वतिने कै.गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नावाने असणारी उसतोड कामगारांच्या अपघाती विमा योजना अंतर्गत मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहीती दिली.यावेळी नांदेड जिल्हा नियोजन समिती सदस्य बालाजीराव वैजाळे,मनोहर ढेपे,चिंचोली सरपंच गोविंदराव पाटील,मारोती चाफेवार,अशोक पा. कळकेकर,माधव पा. घोरबांड,अनिकेत पा. जोमेगावकर,पंजाब माळेगावे,हातनी सरपंच सतीश भदरगे उपस्थित होते.