कंधार ; ता.प्र.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये कंधार येथील पत्रकार तथा युगसाक्षी चे संपादक दिगांबर वाघमारे यांची जिल्हा सहसचिव पदी निवड झाल्या बद्दल कंधार येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा कंधार च्या वतीने व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष रमेश पांडे, सरचिटणीस रुपेश पाडमुख यांनी नांदेड येथे आयोजित बैठकीत सदर कार्यकारणी पुढील प्रमाणे घोषीत केली .अध्यक्षपदी- राजू
पाटील-(बिलोली), उपाध्यक्ष -ज्ञानोबा पवार, (लोहा), सचिव- प्रल्हाद हिवराळे, (उमरी), संघटक – हाणमंत पाटील वाडेकर,कोष्याध्यक्ष- रजाक कुरेशी (मुकामबाद),सहसचिव -दिगंबर वाघमारे (कंधार),
सहकोषाध्यक्ष- सुरेश जोंधळे,
सहसंघटक – जैनोद्दीन पटेल( नायगाव),माधव हाणमंते -(धर्माबाद), शेख आसलम (देगलुर), जावेद अहेमद यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
या निवडीबद्दल कंधार येथे दि.१४ नोव्हेंबर रोजी आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे प्रसिद्धीप्रमुख तथा प्रवक्ते योगेश पाटील नंदनवनकर यांनी व साजीद इन्टीट्युटचे संचालक प्रा.शेख साजीद ,ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष गंगाधर कांबळे यांनी संयुक्तपणे दिगांबर वाघमारे यांचा सत्कार केला .
दरम्यान महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष मिर्झा जमीर बेग यांच्या अध्यक्षतेखाली दिगांबर वाघमारे यांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी एस.पी.केंद्रे,माधव भालेराव ,प्रा.भागवत गोरे,महमंद सिंकदर,नितीन मोरे ,प्रा.सुभाष वाघमारे ,हानमंत मुसळे,डॉ.माधव कुद्रे आदीची यावेळी उपस्थिती होती.
-**** दिपावलीच्या शुभेच्छा ****