आजचा अभूतपूर्व त्रिवेणी संगम : लक्ष्मीपूजन, लहुजी वस्ताद आणि चाचा नेहरु

दिवाळी लक्ष्मीपूजन ही भारतीय संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण पूजा आहे. आश्विन महिन्यातील अमावास्येला संध्याकाळी ही पूजा प्रतिवर्षी केली जाते. अश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते, अशी आख्यायिका आहे. समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा या रात्री केली जाते. श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. याखेरीज चलनी नोटा, नाणी, सोन्याचे अलंकार यांचीही पूजा यावेळी केली जाते. व्यापारी वर्गात यापूजेच्या वेळी फटाके उडवून आनंद साजरा केला जातो.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले अशी कथा आहे. पौराणिक साहित्यात लक्ष्मी ही विष्णूची पत्नी मानली गेली आहे. घर असो किंवा कार्यालय….दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला प्रत्येक ठिकाणी मोठं महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशिष्ट मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केली जाते. दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा असे म्हणत हा मांगल्यपूर्ण सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिव्यांची आणि त्याबरोबरीने आनंदाची उधळण करणारा हा सण राज्यासह देशविदेशात साजरा केला जातो. दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावर तिचा कृपा-आशीर्वाद राहावा, यासाठी मनोकामना केली जाते.

अश्विन कृष्ण अमावास्येच्या मुहूर्तावर घरात कुटुंबातील सर्वांच्या उपस्थितीत ही पूजा करावी. यावेळी घरातील लक्ष्मी म्हणजेच धनाची विशेषत्त्वाने पूजा केली जाते. यावेळी देवाला आणि धनाला धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. त्यानंतर तो प्रसाद म्हणून खाल्ला जातो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले अशी कथा आहे. प्रातःकाळी अभ्यंगस्नान करून देवपूजा, ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी (संध्याकाळी) सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा लक्ष्मीपूजनाचा विधी आहे. अश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते, अशी आख्यायिका आहे.

परंतु आजच्या कोरोनाच्या संकटात लक्ष्मीपूजन साध्या नव्हे तर उत्साहात साजरे होत आहे. बाजारपेठा फुलल्या आहेत. लोकांना कोरोनाची तीळमात्र भिती राहिली नाही असे दिसते. गेल्या काही महिन्यांत अर्थव्यवस्था म्हणजेच लक्ष्मीव्यवस्थेची घडी व्यवस्थित बसावी ह्याकरिता सगळे काही टप्याटप्याने खुले करण्यात आले.‌फक्त शाळा आणि मंदिरेच सरकारच्या लाॅकपमध्ये आहेत. मंदिरे उघडण्याची मागणी होत आहे परंतु शाळा उघडण्याची मागणी कुणी करीत नाही आहे. मुलांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आॅनलाईन शिक्षणाने काही फारसा फायदा किंवा लाभ गोरगरिब विद्यार्थ्यांना‌ झाला असे नाही. मुले हे देशाचे भविष्य मानणाऱ्या देशाच्या पहिल्या पंतप्रधानांचा म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज जन्मदिवस. हा बालदिन साजरा केला जातो.

१४ नोव्हेंबरला बालदिन साजरा होतो. याच दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस. चाचा नेहरुंना मुले आणि फुले फार आवडायची. ते तासन तास मुलांमध्ये रमून जायचे. तसेच ते दिवसातून काही क्षण निसर्गमय बागेत फिरायचे. मुले ही देवाघरची फुले आणि म्हणूनच या फुलांना फुलविण्यासाठी मुलात मूल बनून पंडितजी रंगून जायचे.

१४ नोव्हेंबर रोजी आपला वाढदिवस पंडितजी मुलांमध्येच साजरा करवायचे. तो दिवस ते संपूर्णपणे बालकांच्या समवेत घालवायचे. मुलांना गोडधोड पदार्थ खायला द्यायचे, सुंदर सुंदर खेळणी द्यायचे. विदेशी मुलांनाही खेळणी पाठवायचे. असे होते मुलांचे लाडके चाचा. त्यांना मुलेही लाडाने “नेहरु चाचा’ म्हणून संबोधायची. त्यामुळेच नेहरुजींच्या वाढदिवसदिनी साऱ्या देशभर बालदिन साजरा केला जातो. ही पंडितजींच्या अनोख्या स्मृतीची आठवण आहे.

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रभावी माध्यम निर्माण करावे असे विचार पंडित जवाहरलाल नेहरुजींच्या मनात वारंवार येत असत. कारण मुले ही स्वतःचा आकार, रंगरुप आणि गंध घेऊन उमलत असतात. मुलांची कल्पना शक्ती प्रचंड असते. त्यांचे प्रत्येकाचे अनुभव विश्व आणि जाणिवा वेगळ्या असतात. त्याचे प्रकटीकरणही वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण असते. या विचारातूनच मुलांसाठी एक मुक्तांगण म्हणजेच बालभवनाची संकल्पना आकाराला आली. 1956 रोजी तुर्कमान गेट, कोटलारोड न्यू दिल्ली येथे एक वास्तू उभारुन “बालभवन” ची स्थापना केली. यासाठी बालभवन सोसायटी निर्माण झाली. त्या सोसायटीचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरु. ही पंडितजींची मुलांसाठी कायम स्वरुपी देणगी आहे असे म्हणायला हरकत नाही.

बालभवन म्हणजे छोट्या मुलांचे मुक्तांगण. बिनभिंतीची शाळा. बालकांच्या सर्वांगीण विकासाचे उत्तम माध्यम. बालकांच्या सुप्त कलागुणांचा विकास करणारे एक प्रभावी साधन. ही एक नवीन शैक्षणिक पद्धत. बालकेंद्रित शिक्षण प्रणालीनुसार बालकांचे सर्वांगीण विकास साधणारे उत्तम केंद्र.

यावर्षी बालदिवसाच्या निमित्ताने बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता १ ली ते १२ वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बालदिवस सप्ताह दि. ८ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत शासनाच्यावतीने साजरा करण्यात आला. या सप्ताहांतर्गत इयत्तानिहिय काही उपक्रम राबविले गेले. भाषण-‘मी नेहरु बोलतो’, पत्रलेखन-चाचा पं.नेहरुंना पत्र
स्वलिखित कविता वाचन-पं.नेहरुंवर स्वत: लिहिलेल्या कवितेचे वाचन करुन त्याचा व्हिडिओ अपलोड करणे.
नाट्यछटा/एकपात्री-पं. नेहरुंजीच्या जीवनावर आधारीत तीन मिनीटांचा व्हिडिओ अपलोड करणे,
पोस्टर तयार करणे-स्वातंत्र्य संग्रामातील पं.नेहरुजींच्या जीवनावर आधारित प्रसंग चित्र रेखाटणे व पोस्टर अपलोड करणे. निबंध लेखन-1) स्वातंत्र्यसंग्रामातील नेहरुंचे योगदान2) पं. नेहरु-औद्योगिक विकासाचा पाया रचणारे, 3) पं.नेहरु-विज्ञान व तंत्रज्ञान. इयत्ता ११ वी ते १२ वी निबंध लेखन- १) पं.नेहरु-स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडण-घडणातील वाटा, २) पं.नेहरु-भारताचा शोध आत्मचरित्र (शब्द मर्यादा ७०० ते ८०० निबंध लिहून अपलोड करणे,व्हिडिओ तयार करणे- पं.नेहरुंच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंटरी तयार करणे, (५ मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करणे), दि. १४ नोव्हेंबर, रोजी इयता १ ली ते १२ वी साठी बालसाहित्य ई-संमेलन-पं.नेहरुंशी संबंधित स्वरचित कथा, कविता, प्रसंग तीन मिनिटांत सादर करणे असे उपक्रम घेण्यात आले.

जुन्या शिक्षण पद्धतीनुसार चार भिंतीच्या खोलीतील शिक्षण, क्रमिक पाठयपुस्तकांची सक्ती, वेळेचे बंधन, वेळा पत्रकानुसार व तासिकेप्रमाणे विषय शिकविणे या गोष्टींना बालभवन केंद्रात फाटा देण्यात आला आहे. बालभवनात नैसर्गिकरित्या शिक्षकांबद्दल वातावरण निर्मिती केली जाते. मुलांच्या मुक्त कलांगुणांना वाव दिला जातो. स्थावलंबनाचेही शिक्षण दिले जाते. संस्कारात्मक, कलात्मक व चरित्रात्मक शिक्षणावर भर दिला जातो. बालकांना सर्वांगीण विकासाची संधी प्राप्त करुन दिली जाते. अभ्यासेतर कार्यक्रमांच्या माध्यमातून मुलांना एक नवी दृष्टी, एक नवी दिशा दिली जाते. बालभवन केंद्रात विविध कलेत नैपुण्य प्राप्त केलेले प्रशिक्षक मुलांना विविध कलांचे मार्गदर्शन करतात. या बालभवन केंद्रांत संगीत, हस्तकला, गायन, वादन, चित्रकला, नृत्य, नाट्य, कथाकथन, विणकाम, लोककला, शिल्पकाम, मातीकाम आदी कलांचे शिक्षण देतात. दिल्ली सरकारच्या सौजन्याने गोव्यातही विजयादेवी राणे यांच्या अध्यक्षतेसाठी पणजी, केरी, पर्ये, साखळी, डिचोली, पेडणे, काणकोण, फोंडा, म्हापसा, शिरोडा, मडगाव वगैरे अनेक ठिकाणी बालभवन केंद्रातून मुलांसाठी भरीव कार्य चालू आहे.

१८५६ रोजी इंग्लंडमध्ये जगात पहिल्यांदा चेल्सी इथे बालदिन साजरा करण्यात आला होता. तिथल्या चर्चमध्ये लहान मुलांसाठी एक खास दिवस ठेवला जातो. या दिवशी लहान मुलांसाठी खास गोष्टी, गाणी, खेळ गप्पा ठेवल्या जातात. त्यानंतर हळूहळू सर्व देशांमध्ये वर्षातील एक दिवस बालदिन म्हणून त्यांच्या सोईनुसार साजरा करण्यास सुरुवात झाली. १९५० रोजी वुमेंस इंटरनॅशनल फेरडेशननं १ जून रोजी बालदिन साजरा करण्यावर बंदी आणली. १ जून हा दिवस सोडून कोणत्याही दिवशी बालदिन साजरा करण्यास हरकत नसल्याचं सांगितलं गेलं. त्याचं कारण होतं १ जून हा दिवस Children’s protection day म्हणून साजरा केला जात होता. त्यानंतर १९५४ रोजी संयुक्त राष्ट्राने मुलांचे अधिकार आणि हक्क लक्षात घेऊन २० नोव्हेंबर हा जागतिक बालदिन म्हणून घोषित केला. आता सर्व देशांमध्ये २० नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. १९५४ ते १९६४ रोजी भारतातही २० नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जात होता.

१९६४ रोजी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या निधनानंतर मात्र भारतातील बालदिनाची तारीख बदलण्यात आली. पंडित जवाहरलाल नेहरू यांना आदरांजली म्हणून १४ नोव्हेंबर म्हणजेच त्यांचा जन्मदिन हा बालदिन म्हणून भारतात साजरा करण्यात येतो. २७ मे १९६४ रोजी याबाबत भारतात सर्वानुमते अधिकृत घोषणा करण्यात आली.

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्‍मदिवस ‘बाल दिन’ म्हणून भारतात साजरा केला जातो. केवळ भारतातमध्ये बालदिन १४ नोव्हेंबरला साजरा केला जातो. जगभरात १९२५ पासून ‘बाल दिन’साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने २० नोव्हेंबर १९५४ ला बाल दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. आजही विविध देशांमध्ये ‘बाल दिन’च्या तारखांबाबत भिन्नता आढळते. भारतात मात्र १९६४ नंतर १४ नोव्हेंबरला ‘बाल दिन’ साजरा केला जाऊ लागला. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू लहान मुलांमध्ये रमायचे आणि त्यांच्या लाघवी स्वभावामुळे मुलांनाही ते आपलेसे वाटायचे. २७ मे १९६४ ला पंडितजींचे निधन झाले. चिमुरड्यांच्या लाडक्या ‘चाचा’ नेहरूंना आदरांजली म्हणून त्यांच्या जन्मदिनी अर्थात १४ नोव्हेंबरला भारतात ‘बाल दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

१९६४ रोजी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या निधनानंतर मात्र भारतातील बालदिनाची तारीख बदलण्यात आली. पंडित जवाहरलाल नेहरू यांना आदरांजली म्हणून १४ नोव्हेंबर म्हणजेच त्यांचा जन्मदिन हा बालदिन म्हणून भारतात साजरा करण्यात येतो. २७ मे १९६४ रोजी याबाबत भारतात सर्वानुमते अधिकृत घोषणा करण्यात आली.

नेहरू राजकारणी नसते तर ते नक्कीच इंग्रजी भाषेत लिहिणारे जगप्रसिद्ध असे लेखक झाले असते, असे मत प्रख्यात साहित्यिक रस्किन बॉंड आणि मुल्कराज आनंद यांनी व्यक्त केले होते.मध्यंतरी एकदा ‘कोटेशन्स’ चे पुस्तक वाचत होतो. त्यात अनेक प्राचीन भारतीय आणि ग्रीक, युरोपियन विचारवंतांचे विचार अभ्यासायला मिळाले. आधुनिक कालखंडातील अनेक साहित्यिक, लेखक विचारवंताचे आणि काही राजकीय नेत्यांचे विचार त्यात नमूद केले होते. भारतातील अनेक विचारवंत, तत्वचिंतक यांचेही विचारधन त्यात होते. मात्र राजकीय व्यक्ती असूनही ज्यांच्या विचारांचा समावेश केला होता , अशात भारतीय म्हटले तर दोनच नेते पाहायला मिळाले, ते म्हणजे गांधी आणि दुसरे नेहरू!भारतातील इतर नेत्यांचे ‘कोटेशन्स’ तेवढ्या प्रमाणात इंग्रजी भाषेत आढळून येत नाही, याचं कारण कदाचित इतर नेत्यांचे इंग्रजी भाषेत लेखन नसेल, किंवा असलेच तर ते जागतिक स्तरावर पोचलं नसेल किंवा ते मोजकं लेखन असेल. जागतिक स्तरावर वितरण असणाऱ्या प्रकाशकाकडून पुस्तक प्रकाशित होणे, याचाही फरक पडतो. नेहरूंची सर्वच पुस्तके आंतरराष्ट्रीय प्रकाशकांनी प्रकाशित केली. याचा अर्थ असाही की त्यांच्या पुस्तकांच्या प्रकाशनापूर्वीच त्यांची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर नेता अशी झाली होती.१९वे शतक हे जगभर पसरलेल्या साम्राज्यशाहीच्या विस्ताराचे शतक होते. मात्र याच शतकाच्या उत्तरार्धात विविध वसाहतीत स्वातंत्र्य आंदोलनास सुरुवात झाली. याच कालखंडात आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीला जगाच्या पाठीवर अनेक देशात त्यात त्या देशातील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, प्रचंड लोकप्रियता लाभलेले अनेक नेते तयार झाले. म्यानमारमध्ये ऑंग सान, चीनमध्ये चैंग कै शेक, श्रीलंकेत बंदरनायके अगदी त्याच प्रमाणे अरब देशात, काही आफ्रिकन देशातही नेल्सन मंडेला वगैरे अनेक नेते निर्माण झाले ज्यांनी चळवळीत, आंदोलनातही भाग घेतला, कारावासही भोगला, लोकप्रियताही मिळवली, यशस्वी राजकारणही केले आणि तत्वचिंतनपर लेखनही केले. पण हे सर्व नेते सर्व पातळ्यांवर काम करू शकले नाहीत. काही लेखक होते पण चळवळीत नव्हते, कोणी तत्वचिंतनपर लेखन केले पण ते लोकप्रिय व यशस्वी राजकारणी होऊ शकले नाहीत.परंतु जवाहरलाल नेहरूंनी मात्र यशस्वी राजकारणासोबतच लेखन केले आणि त्यांचे संशोधनात्मक न राहता त्यास साहित्यिक मूल्य लाभले आणि त्यातून त्यांची ओळख एक साहित्यिक राजकारणी अशी निर्माण झाली.

“मोहब्बत करनेवाला जा रहा है..” नेहरूंनी भारताचा स्वतंत्रलढा आणि त्यानंतरच्या कालखंडात त्यांनी आधुनिक भारताच्या निर्मितीत मोठे योगदान दिले. आपल्या आयुष्यातील बराच मोठा कालखंड प्रत्यक्ष, सामाजिक सुधारणा आंदोलन, साम्राज्यशाहीच्या विरोधातील स्वातंत्र्य आंदोलनात आणि या दरम्यान तब्बल ९ वर्ष कारावासही भोगला. त्याचसोबत आपले राजकीय वैचारिक चिंतन मांडणारे अनेक ग्रंथ देखील लिहिले.

जवाहरलाल नेहरूंचा जन्म भारतात, मात्र पूर्ण शिक्षण युरोपात झाले होते. उच्चभ्रू वर्तुळात वावरत पाश्चात्य विचारांचा व आचारांचा प्रभाव असणाऱ्या नेहरूंचे भारतीय जनतेचा नायक बनणे तसे अवघडच होते. मोतीलाल नेहरूंनी त्यांची जडणघडणच तशी केली होती. श्रीमंती प्रचंड होती. नेहरूंना इंग्लंडमध्ये शिक्षण घेताना जे पैसे पाठवले जायचे ते त्या काळाच्या मानाने खूप होते. पण नेहरूंनी या पैशाचा वापर खूप सुयोग्य पद्धतीने केला. त्यांनी विविध ग्रंथांची खरेदी केली. जगातील विविध भाषेतील पुस्तके त्यांनी विकत घेतली. प्रचंड वाचन केले आणि त्यातूनच त्यांच्यातील साहित्यिक घडला.

नेहरूंचे लेखन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या इतर नेत्यांच्या तुलनेत विपुल आहे. त्यांची प्रमुख चार पुस्तके प्रकाशित आहेत. ‘Glimpses over world history’, ‘An autobiography’ , ‘Discovery of India’ आणि ‘Bunch of old letters’. या शिवाय इतर लेखन आहे, जे टिपण अथवा भाषणांच्या आणि वृत्तपत्रीय लेखांच्या स्वरूपात आहे.
आत्मकथा (मूळ इंग्रजी, मराठी अनुवाद – ना.ग. गोरे), इंदिरेस पत्रे (मूळ इंग्रजी- Letters from a Father to His Daughter; मराठी अनुवाद – वि. ल. बोडस)
भारताचा शोध (मूळ इंग्रजी -Discovery of India, मराठी अनुवाद – साने गुरुजी) या सर्व लेखनामुळे व पुस्तकांमुळे नेहरूंचा नावलौकिक नेहरू एक साहित्यिक म्हणून झालेला आहे. त्यामुळे त्यांचे लेखन निव्वळ राजकीय, सामाजिक आंदोलन अथवा संशोधन स्वरूपाचे न राहता ते एक साहित्य मूल्य म्हणून पुढे आले.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ साली अलाहाबादमध्ये झाला. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण घरी खासगी शिक्षकांकडून घेतले. वयाच्या पंधराव्या वर्षी ते इंग्लंडला गेले आणि हॅरो येथे दोन वर्षे राहिल्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. या विद्यापीठातून त्यांनी नैसर्गिक विज्ञानात पदवी प्राप्त केली. १९१२ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी सरळ राजकारणात उडी घेतली. विद्यार्थी दशेत असतानाही, परकीय जुलमी राजवटीखालील देशांच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांना रुची होती. आयर्लंडमध्ये झालेल्या सिन फेन आंदोलनाबाबत त्यांना विशेष स्वारस्य होतं. भारतात स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी होण्यावाचून त्यांना पर्याय नव्हता.

१९१२ मध्ये एक प्रतिनिधी म्हणून ते बांकीपूर काँग्रेसला उपस्थित राहिले. १९१९ मध्ये अलाहाबादच्या होम रुल लीगचे सचिव बनले. १९१६ मध्ये ते पहिल्यांदा महात्मा गांधींना भेटले आणि खूपच प्रेरित झाले. त्यांनी १९२० मध्ये उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यात पहिल्या किसान मार्चचं आयोजन केलं. १९२०-२२ दरम्यान असहकार चळवळीच्या संदर्भात त्यांना दोन वेळा तुरुंगात जावे लागले.

सप्टेंबर १९२३ मध्ये नेहरू अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस बनले. १९२६ मध्ये त्यांनी इटली, स्वित्झर्लंड, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी आणि रशियाचा दौरा केला. बेल्जिअममध्ये ब्रुसेल्स येथील गरीब देशांच्या संमेलनाला ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. १९२७ मध्ये मॉस्को येथे ऑक्टोबर समाजवादी क्रांतीच्या दहाव्या वर्धापन दिन सोहळ्यालाही ते उपस्थित राहिले. तत्पूर्वी १९२६ मध्ये मद्रास काँग्रेसमध्ये काँग्रेसला स्वातंत्र्याच्या उद्दिष्टाप्रती कटिबध्द बनवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. १९२८ मध्ये लखनौमध्ये सायमन कमिशनच्या विरोधात ते अग्रणी होते.

एका मिरवणुकीचे नेतृत्व करताना त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. २९ ऑगस्ट १९२८ रोजी त्यांनी सर्वपक्षीय परिषदेत भाग घेतला आणि त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या भारतीय घटनात्मक सुधारणेवरील नेहरू अहवालावर स्वाक्षरी करणाऱ्यांपैकी ते एक होते. त्याचवर्षी त्यांनी “भारतीय स्वातंत्र्य लीग”ची स्थापना केली आणि त्याचे सरचिटणीसही झाले. भारताला ब्रिटिश साम्राज्यापासून पूर्णपणे वेगळे करणे हा या लीगचा मूळ उद्देश होता.

१९२९ मध्ये पंडित नेहरू यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. ज्याचा मुख्य उद्देश देशासाठी संपूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करणे हा होता. १९३०-३५ दरम्यान मिठाचा सत्याग्रह आणि काँग्रेसच्या अन्य आंदोलनांमुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास घडला. १४ फेब्रुवारी 1 १९३५ रोजी अल्मोरा तुरुंगात त्यांनी स्वत:चे “आत्मचरित्र” पूर्ण केलं. सुटका झाल्यानंतर आपल्या आजारी पत्नीला पाहण्यासाठी ते स्वित्झर्लंडला गेले. फेब्रुवारी-मार्च १९३६ मध्ये त्यांनी लंडनचा दौरा केला. जुलै १९३८ मध्ये त्यांनी स्पेनचा दौरा केला तेव्हा तिथे नागरी युध्द सुरू होतं. दुसरे महायुध्द सुरू होण्यापूर्वी ते चीनच्या दौऱ्यावरही गेले होते.

३१ ऑक्टोबर १९४० रोजी भारतावर युध्दात सहभागी होण्यासाठी दवाब टाकल्याच्या विरोधात नेहरू यांनी केलेल्या वैयक्तिक सत्याग्रहामुळे त्यांना अटक झाली. डिसेंबर १९४१ मध्ये अन्य नेत्यांसह त्यांची सुटका झाली. ७ ऑगस्ट १९४२ रोजी पंडित नेहरू यांनी मुंबईत अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत ऐतिहासिक “भारत छोडो”चा संकल्प सोडला. ८ ऑगस्ट १९४२ रोजी अन्य नेत्यांबरोबर त्यांनाही अटक झाली आणि अहमदनगर किल्ल्यावर त्यांची रवानगी करण्यात आली. ही त्यांची सर्वाधिक आणि शेवटची कोठडी होती. एकूण ९ वेळा त्यांना तुरुंगवास घडला होता.

जानेवारी १९४५ मध्ये सुटका झाल्यावर त्यांनी देशद्रोहाचा आरोप असलेल्या आयएनएचे अधिकारी आणि व्यक्तींचा कायदेशीरपणे बचाव केला. मार्च १९४६ मध्ये त्यांनी दक्षिण-पूर्व आशियाचा दौरा केला. ६ जुलै १९४६ रोजी चौथ्यांदा ते काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि १९५१ ते १९५४ पर्यंत आणखी तीन वेळा ते अध्यक्ष म्हणून निवडून आले.

हा १९४७ चा प्रसंग आहे. फाळणीनंतर सीमेच्या दोन्ही बाजूंचे लोक एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. लाहोर असो वा इतर कुठलंही शहर, सगळीकडे हत्या आणि लूटमार सुरू होती. जवाहरलाल नेहरू यांना अचानक माहिती मिळाली की, दिल्लीच्या कनॉट प्लेसमध्ये मुस्लिमांची दुकानं लुटण्यात येत. नेहरू तिथं पोहोचले तेव्हा हिंदू आणि शीख दंगेखोर मुस्लिमांच्या दुकानांमधून महिलांचे हॅंडबॅग्स, कॉस्मेटिक्स आणि मफलर घेऊन पळत होते. पोलीस फक्त बघ्याच्या भूमिकेत होते. नेहरूंना प्रचंड राग आला आणि त्यांनी शेजारी उभ्या असलेल्या एका सुस्त पोलिसाची लाठी हिसकावली आणि दंगेखोरांना तिथून पिटाळून लावलं. हे इथंच संपत नाही.

माजी IPS अधिकारी आणि अनेक देशांमध्ये भारताचे राजदूत असलेले बदरूद्दीन तय्यब ‘मेमॉयर्स ऑफ एन इगोइस्ट’ या त्यांच्या आत्मकथेत नेहरूंविषयी एक किस्सा सांगतात.

“एका रात्री मी नेहरू यांच्या घरी पोहोचलो. त्यांना माहिती दिली की, शरणार्थी शिबिरात पोहोचण्याच्या प्रयत्नात असलेल्या जुन्या दिल्लीतील मुस्लीमांना मिंटो ब्रीजच्या जवळपास दंगेखोर घेरून मारत आहेत. हे ऐकताच नेहरू तडक तिथून उठले आणि वेगाने शिड्या चढत वरच्या खोलीत गेले.”

थोड्यावेळानं ते खाली उतरले तेव्हा त्यांच्या हातात एक जुनी धुळीनं माखलेली रिव्हॉल्व्हर होती. खरंतर ही रिव्हॉल्व्हर त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांची होती, ज्यातून अनेक वर्षांपासून गोळी चालवण्यात आलेली नव्हती.

त्यांनी मला सांगितलं की, आपण खराब आणि जुने कपडे घालून रात्री मिंटो ब्रीजला जाऊ. आपण तिथून पळून जाणारे मुस्लीम आहोत, असं भासवू. जर कुणी आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्याला आपण गोळी घालू.

मी नेहरू यांचं म्हणणं ऐकून हादरलो. अशा घटनांशी दोन हात करण्यासाठी इतरही चांगले पर्याय आहेत, हे जगातली दुसरी सर्वांत मोठी लोकसंख्या असलेल्या देशाच्या पंतप्रधानांना समजावण्यात मला जोर लावावा लागला.

माउंटबॅटन यांना नेहमी ही भीती असायची की नेहरू यांचा हाच आवेश एखाद्या दिवशी त्यांच्या मृत्यूचं कारण ना ठरो. यासाठी त्यांनी नेहरूंवर लक्ष ठेवण्यासाठी काही सैनिक तैनात केले होते.

सुरक्षारक्षकांविना झाकीर हुसैन यांना वाचवायला निघाले
स्वातंत्र्य मिळण्याच्या काही दिवसांआधीची ही घटना. नेहरू यांचे सहकारी मोहम्मद युनूस यांना जामिया मिलिया इस्लामियाचे मुख्याध्यापक डॉ. झाकीर हुसैन यांचा रात्री अकरा वाजता फोन आला. ते फार घाबरलेले होते.

युनूस तेव्हा नेहरूंच्या घरीच थांबले होते. झाकीर हुसैन यांनी सांगितलं की कॉलेजबाहेर दंगेखोरांची मोठी गर्दी झाली आहे आणि त्यांचा हेतू काही चांगला दिसत नाही.

मोहम्मद यूनूस त्यांच्या ‘परसन्स, पॅशन्स अँड पॉलिटीक्स’ या पुस्तकात लिहितात – “फोन होताच मी नेहरूंकडे धावत गेलो. त्यावेळीही ते त्यांच्या कार्यालयात काम करत होते. मी त्यांना फोनवर मिळालेली माहिती सांगितली.”

त्यांनी तात्काळ गाडी मागवली आणि मला त्यात बसायला सांगितलं. कारमध्ये त्यांच्यासोबत सुरक्षारक्षक नव्हता. आम्ही जामियाला पोहोचलो आणि बघितलं की घाबरलेले विद्यार्थी आणि कर्मचारी कॉलेजमध्ये लपून बसले होते. त्यांना त्या हिंसक जमावानं घेरलं होतं.

जसे नेहरू तिथं पोहोचले, जमावानं त्यांना ओळखलं आणि त्यांच्या बाजूला गोळा झाले. नेहरू यांनी वेळ न दवडता जमावाच्या वागणुकीवर आक्षेप घेत ओरडायला सुरुवात केली.

काही क्षणातच जमावाला त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि ते सर्वच नेहरू यांची माफी मागू लागले.

जामियाच्या प्रांगणात प्रवेश करत नेहरूंनी झाकीर साहेबांना धैर्य दिलं. दरम्यानच्या काळात नवनियुक्त व्हॉईसरॉय माउंटबॅटन यांच्यापर्यंत माहिती पोहोचली होती की नेहरू कुठल्याही सुरक्षेविना एका नाराज जमावाला सामोरे गेले.

त्यांनी तत्काळ काही मशीनगन असलेल्या जीपमध्ये आपले सुरक्षा रक्षक नेहरू यांच्या सुरक्षेसाठी पाठवून दिलं. जेव्हा शस्त्रसज्ज सुरक्षारक्षक तिथं पोहोचले तेव्हा नेहरू यांना जमावानं घेराव घातलेलं दृष्य त्यांनी बघितलं.

पण ते काही कारवाई सुरू करतील त्याआधीच त्यांना घोषणा ऐकू आल्या – “जवाहरलाल नेहरू जिंदाबाद!”

पुढे जाऊन झाकीर हुसैन हे भारताचे तिसरे राष्ट्रपती झाले. नेहरू यांचे भाचे आणि अमेरिकेत माजी राजदूत बी. के. नेहरू यांनी १९३५ मध्ये फोरी या हंगेरियन युवतीशी लग्न केलं.

लग्नाआधी तिची आपल्या कुटुंबासोबत भेट घडवून आणण्यासाठी आनंद भवन इथं घेऊन गेले. खादी घालणाऱ्या संपूर्ण कुटुंबाला भेटून तिला फार आनंद झाला.

पण नेहरू त्या वेळेस कलकत्त्याच्या अलीपूर जेलमध्ये कैदे होते. बी. के. नेहरू यांनी ती भेट साधवण्यासाठी आपल्या भावी पत्नीला कलकत्त्याला नेलं.

फोरी यांनी जेव्हा नेहरू यांना बघितलं तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही की, ही अगदी सभ्य, स्नेही आणि इंग्रजांसारखी दिसणारी व्यक्ती एखादा कायदा तोडू शकते.

जेव्हा नेहरूंचा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा फोरी आपले अश्रू थांबवू शकल्या नाही. नेहरूंना त्यांच्या कुटुंबाला महिन्यातून फक्त एकदाच पत्र लिहिण्याची परवानगी होती.

बी. के. नेहरू त्यांच्या ‘नाइस गाईज फिनीश सेकंड’ या आत्मकथनात लिहितात – “पुढच्या महिन्यात नेहरू यांनी लिहिलेली पत्रं जेव्हा आनंद भवनात आली, तेव्हा त्यात एक पत्र फोरी हिच्यासाठीही लिहिलेलं होतं.”

त्यात त्यांनी लिहिलं होतं, तू आता नेहरू कुटुंबाची सदस्य होणार आहेस, म्हणून तुला नेहरू कुटुंबातले काही नियम-कायदेही शिकावे लागतील.

मी बघितलं, जेव्हा तू मला भेटल्यानंतर निरोप घेताना तुझ्या डोळ्यात अश्रू होते. एक खूणगाठ मनाशी बांधून ठेव – ‘कितीही मोठं दुःख असू दे, नेहरू कधी रडत नाहीत!’

त्या पाकिटात एक पत्र इंदिरा गांधी यांच्यासाठीही होतं. त्यात त्यांनी कुटुंबाची नवीन सून त्यांना आवडली, असं लिहिलं होतं.

एप्रिल 1949 मध्ये म्यानमारचे पंतप्रधान यू नू अचानक राजधानी दिल्लीत दाखल झाले. तो रविवार होता. त्यावेळी वाय. डी. गुंडेविया परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी होते. नंतर ते भारताचे परराष्ट्र सचिव झाले.

म्यानमारचे पंतप्रधान दिल्लीत आले, तेव्हा गुंडेविया सकाळी स्विमिंग कॉस्च्यूममध्येच जलतरण तलावाकडेच निघाले होते. आपल्या गाडीत बसून जात असताना त्यांच्या घरातला फोन वाजला. पलीकडे पंतप्रधान नेहरूंचे स्वीय सहाय्यक बोलत होते.

पंतप्रधानांना तातडीने तुमच्याशी बोलायचं आहे असं ते म्हणाले. आहे त्या अवतारातच गुंडेविया नेहरूंना भेटायला निघाले.

हा प्रसंग गुंडेविया यांनी ‘आऊटसाईड द आरकाईव्ह्स’ मध्ये मांडला आहे – नेहरूंना भेटण्यासाठी त्यांच्या कक्षात प्रवेश केला. नेहरू हसून म्हणाले, “कुठे निघाला आहात? म्यानमारच्या पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी तुम्ही विमानतळावर का गेला नाहीत?”

त्यावेळी मी शॉर्ट्स, बुशशर्ट आणि चपलांमध्ये होतो, आणि माझ्या काखेत टॉवेल होता. “मी पोहण्यासाठी निघालो आहे,” असं प्रांजळपणे सांगितलं.

आणखी एका तासात त्यांचं विमानतळावर आगमन होईल हे त्यांनी सांगितलं. मी त्यांना सांगितलं की प्रोटोकॉलने माझी आवश्यकता नाही असं सांगण्यात आलं होतं. म्हणून मी तयार झालो नाही.

त्यावर ते ओरडून म्हणाले, “प्रोटोकॉल, कसला प्रोटोकॉल? म्यानमारच्या पंतप्रधानांना याआधी केवळ तुम्हीच भेटला आहात. माझ्याबरोबर गाडीत बसा आणि विमानतळावर चला.”

पोहण्याच्या वेशात आणि चपलांमध्ये असल्याने मी नेहरूंना विचारलं “अशा अवतारात येऊ?”

ते ‘हो’ म्हणाले.

त्यांनी कक्षाचा दरवाजा उघडला आणि भराभर पायऱ्या उतरून आम्ही गाडीच्या दिशेने निघालो. पोहण्याच्या कपड्यातच मी नेहरूंच्या बरोबर गाडीत बसलो. त्यांच्याबरोबर विमानतळावर पोहोचलो तेव्हा माझा अवतार पाहून तिथे उपस्थित सगळेच आश्चर्यचकित झाले.

म्यानमारचे पंतप्रधान यू नू यांचं आगमन झालं. त्यांची आणि नेहरूंची भेट झाली. औपचारिक शिष्टाचार झाल्यानंतर दुसऱ्या गाडीने मी घरी गेलो.

पण ज्या गाडीत दोन देशांचे पंतप्रधान बसणार होते त्या गाडीत मागच्या सीटवर पोहण्याच्या वेशात मी होतो. बरोबर अंग पुसण्यासाठीचा टॉवेलही होता.

दुसऱ्या दिवशी माझ्या टेबलवर एक पार्सल होतं, ज्यामध्ये पोहण्याचा पोशाख आणि टॉवेल काळजीपूर्वक पॅक केलेलं होतं.

नेहरू यांना एडविना माउंटबॅटन आवडायची, त्यांचं तिच्यावर प्रेम असल्याचं काहीजण खाजगीत सांगतात.

१९४९ मध्ये नेहरू पहिल्यांदा कॉमनवेल्थ परिषदेत सहभागी होण्यासाठी लंडनला गेले होते. त्यावेळी खुशवंत सिंग भारतीय दूतावासात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहत होते.

खुशवंत आपल्या ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा टेबलवर भारताचे राजदूत कृष्णा मेनन यांचा एक निरोप आला. “मला ताबडतोब भेटा,” असं त्यात लिहिलं होतं.

खुशवंत सिंग यांनी ‘ट्रूथ, लव अँड लिटिल मॅलिस’ या आपल्या पुस्तकात हा किस्सा कथन केला आहे – भेटायला जाण्याआधी नेहरूंबाबत वर्तमानपत्रांमध्ये काही वावगं छापून आलेलं नाही ना, हे पाहू लागलो.

‘डेली हेराल्ड’ या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर नेहरू आणि लेडी माउंटबॅटन यांचं छायाचित्र छापलं होतं. नाईटीमध्ये असलेल्या माउंटबॅटन नेहरूंसाठी आपल्या घराचा दरवाजा उघडत असल्याचा तो फोटो होता. या फोटोखाली वाक्य होतं- ‘लेडी माउंटबॅटन्स मिडनाईट व्हिजिटर’, अर्थात लेडी माउंटबॅटन यांचा मध्यरात्रीचा पाहुणा.

संबंधित बातमीत असंही म्हटलं होतं की लेडी माउंटबॅटन त्या वेळी लंडन शहरात नव्हत्या.

या फोटोचा संदर्भ लक्षात घेऊन मी मेमन यांच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथं जाताच ते माझ्यावर ओरडले, “तुम्ही आजचा हेराल्डचा अंक पाहिलात का? पंतप्रधान तुमच्यावर अतिशय नाराज आहेत.”

“या बातमीशी माझं काही देणंघेणं नाही,” मी स्पष्ट केलं. “पंतप्रधान विमानतळावर उतरल्यानंतर थेट माउंटबॅटन यांच्या घरी जातील, याची मला काय कल्पना?”

खुशवंत सिंह पुढे लिहितात – मी दोन दिवस नेहरूंच्या समोर फिरकलोच नाही. त्यानंतर परिषदेच्या कार्यक्रमांमध्ये ते इतके व्यस्त झाले की हेरॉल्डमधल्या छायाचित्राचं प्रकरण ते विसरूनही गेले.

भारतात परतण्यापूर्वी नेहरूंनी लेडी माउंटबॅटन यांना सोहोमधल्या एका ग्रीक रेस्टॉरंटमध्ये मेजवानीचं आमंत्रण दिलं. रेस्टॉरंटच्या मालकाने त्यांना ओळखलं. आपल्या हॉटेलमध्ये नेहरू आले आहेत, याचा प्रचार करण्यासाठी त्यांनी प्रसारमाध्यमांना बोलावलं.

दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांमध्ये नेहरू आणि लेडी माउंटबॅटन एकत्र भोजन करत असल्याचं छायाचित्र प्रसिद्ध झालं.

फोटो पाहताक्षणी हे प्रकरण आपल्याला शेकणार हे माझ्या लक्षात आलं. मी ऑफिसमध्ये पोहोचलो तेव्हा टेबलवर पुन्हा एकदा मेमन यांचा निरोप होता. यावेळीही तोच निरोप होता- “पंतप्रधान तुम्हाला ताबडतोब भेटू इच्छितात.”

मी त्यांना भेटायला क्लैरिजेस हॉटेलमध्ये पोहोचलो. त्यांचे सचिव मथाई यांना भेटलो. त्यांनी नेहरूंच्या खोलीत जायला सांगितलं. मी आत प्रवेश करण्यापूर्वी दरवाज्यावर टकटक केली.

“कोण?” त्यांनी आतून विचारलं.

“तुम्ही मला बोलावलं आहे.”

“कोण आपण?”

“लंडनमधला तुमचा जनसंपर्क अधिकारी आहे.”

त्यांनी आत बोलावलं. मला आपादमस्तक पाहिल्यानंतर ते म्हणाले, “तुमच्या जनसंपर्काची पद्धत अजबच आहे.”

ब्रीफकेसमध्ये नेहरूंचा सिगारेटचा (स्टेट एक्स्प्रेस ५५५ ) डबा, काडेपेटी, ते वाचत असलेलं पुस्तक, वैयक्तिक पत्रं, घसा नीट राखण्यासाठी औषधाचं एक पॅकेट आणि पुस्तकांच्या नोट्स काढण्यासाठी पेन्सिल असायची.

जिथं जायचं आहे तिथे ही ब्रीफकेस असली पाहिजे, असा नेहरूंचा आदेश होता.

नेहरूंना वायफळ खर्च अजिबात आवडायचा नाही. ते बाहेर जायला गाडीने निघायचे. त्यावेळी एखादा नळ उघडा दिसला तर गाडी थांबवून ड्रायव्हरला नळ बंद करण्यासाठी धाडायचे.

रुस्तमजी यांनी आपल्या पुस्तकात याविषयी विस्ताराने लिहिलं आहे – सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये नेहरूंच्या राहण्याची व्यवस्था एका खास महालात करण्यात आली होती. या महालातून निघताना ते स्वत: दिवे बंद करायचे.

याच दौऱ्याविषयी मोहम्मद युनूस लिहितात – नेहरूंना झोपताना काही वाचायला हवं होतं. म्हणून त्यासाठी एक टेबल लॅम्पची मागणी त्यांनी केली.

खोलीत वाचनासाठी प्रकाश कमी आहे, हे त्यांच्या मदतनीसाला समजलं. म्हणून त्याने अधिक प्रकाश पुरवणारा लॅम्प त्यांना आणून दिला.

त्या लॅम्पचा प्रखर प्रकाश कमी करण्यासाठी मला एका टॉवेलनं झाकावं लागलं. त्यानंतरही प्रखरतेमुळे टॉवेल जळू लागला.

चिन सोबतच्या संघर्षानंतर काही दिवसात नेहरूजींची प्रकृती बिघडली, त्यानंतर २७ मे १९६४ ला ह्नदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

पंडित नेहरू लहान मुलांवर फार प्रेम करायचे आणि तेवढेच ते आपल्या देशाप्रती देखील समर्पित होते.

जवाहरलाल नेहरू राजकारणातील असा चकाकता तारा होते की त्यांच्या अवतीभवती संपुर्ण राजकारण फिरत होते भारताचा पहिला पंतप्रधान बनुन त्यांनी भारताला गौरवान्वित केले आहे. सोबतच त्यांनी भारताचा मजबुत पाया निर्माण केला शांतता आणि संघटन याकरता निरपेक्ष आंदोलनाची रचना केली. स्वातंत्र्य संग्रामातील एक योध्दा म्हणुन त्यांना यश मिळालं, आधुनिक भारताच्या निर्माणाकरता त्यांचे योगदान अमुल्य आणि अभुतपुर्व असे होते.

आंतराष्ट्रीय सदभावना व सहकार्य वृद्विगंत व्हावे जागतिक शांतता टिकावी या प्रमुख उद्देंशाने पंचशील तत्त्वांचा पुरस्कार करण्यात आला होता.

जैन धर्मामध्ये पंचतत्वांना महत्वपूर्ण स्थान आहेत. तर बौध्द धर्मामध्ये सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, व ब्रहायर्च, या पंचशील मार्गाने शील -संवर्धनावर भर देण्यात आला आहे. आशिखा खंडातील अनेक राष्ट्रांवर बौध्द धर्माचा प्रभाव आहे. पाश्चात्यंच्या गुलामगिरीतून इंडोनिशिया मुक्त करण्यासाठी घेण्यात आलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मेळाव्यात डॉ. सुकार्नो यांनी बौध्द धर्मीय पंचतज्ञ्ल्त्;वांच्या आधारावर पंचशीलचे सर्वाना आव्हान केले. यामध्ये त्यांनी राष्ट्रभक्ती, श्रध्दा, व्यक्ती, स्वातंत्र्य, सामाजिक व देवावर विश्र्वास या तज्ञ्ल्त्;वांची त्यांनी घोषणा केली.

पंडित नेहरुंनी पंचशील तज्ञ्ल्त्;वाचे पावित्र्य ओळखून त्यास देशाच्या अलिप्तवादाची धोरणात स्थान देण्याचे ठरविले २९ एप्रिल १९५४ मध्ये तिबेटच्या स्वायत्ततेसंबंधी भारत व चीन यांच्यात झालेया करारामध्ये आधूनिक पंचशील तत्वांचा समावेश करण्यात आला. ती तत्वे पुढीलप्रमाणे :
(१) कोणत्याही कारणास्तव परराष्ट्रावर आक्रमण न करणे
(२) एकमेंकाच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करणे
(३) परस्परांना हितावह होईल असा समानतेचा व्यवहार करणे.
(४) शांततामय सहजीवनाचा अंगीकार करणे.
(५) परस्परांना सार्वभैामत्वाचा व प्रादेशिक एकात्मतेचा आदर करणे.
भारताने अंगीकारलेल्या पंचशील धोरणास व्हिएतनाम म्यानमार नेपाळ, आओस, युगोस्लाव्हियचा, कंबोडिया, या राष्ट्रांनी मान्यता दिली, इंडोनेशियातील बांडुंग येथे नवस्वतंत्र आफि्रका व आशियायी राष्ट्रांची परिषद १८ एप्रिल १९५५ रोजी संपन्न झाली. या परिषदेत आशिया खंडातील २३ राष्ट्रांनी तर आफ्रिका खंडातील ६ राष्ट्रांनी सहभाग घेतला. या परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधावर विचारविनिमय झाला. पंडित जवाहरलाल नेहरुंनी पंचशील धोरण स्वीकारण्याचे आवाहन परिषदेतील राष्ट्रांना केले. पाकिस्तान वगळता परिषदेतील सर्व राष्ट्रांनी पंचशील धोरणास मान्यता दिली.

आंतरराष्ट्रीय क्षेत्रात लष्करी स्वरुपाच्या व गटातटाच्या राजकारणापासून अलिप्त राहणे म्हणजे अलिप्ततावाद होय. पंडित जवाहरलाल नेहरुं दि. ७ सप्टेंबर १९४६ रोजी भारताच्या अलिप्तवादाची धोरणाचे स्पष्टीकरण करताना म्हणतात कि कोणत्याही राष्ट्राचा उपग्रह म्हणून न राहता, आम्ही एक स्वतंत्र राष्ट्र या नात्याने आंतरराष्ट्रीय परिषददांमध्ये भाग घेऊ आम्ही शक्यातो सत्तागटाच्या राजकारणापासून अलिप्त राहू इच्छितो. अमेरिका, रशिया या महासज्ञ्ल्त्;ाांच्या गटामध्ये सामील न होता जागतिक व्यासपीठावर भारतास सन्मानाचे स्थान मिळविता येईल. नेहरु म्हणतात. महासज्ञ्ल्त्;ाांच्या बलाढय शक्तींशी तोंड देण्यासाठी अलिप्ततावाद माध्यमातून तिसर्‍या शक्तीच्या निर्मितीची आवश्यकता आहे. अलिप्ततावाद या शब्दांचा सर्वप्रथम वापर नेहरुंचे परराष्ट्र व्यवहार पाहणारे व्ही के. कृष्णमेनन यांनी केला. नेहरुंनी आपल्या परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून या संकल्पनेस आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले म्हणून नेहरुंना अलिप्ततावादाचे उदगाते असे संबोधले जाते.
काही राजकीय विचारवंतांनी नेहरुंच्या वरील धोरणास तटस्थता हस्तक्षेप विरहित धोरण असे उपहासात्मक संबोधले मात्र नेहरूनी आपल्या कार्याने अलिप्ततावादाला आंतराष्ट्रीय पातळीवर महत्वाचे स्थान प्राप्त करून दिले. हे धोरण विधायक क्रियाशील व निश्चित स्वरुपाचे आहे. आंतराष्ट्रीय क्षेत्रातील एक कायम टिकणारा नीती प्रवाह म्हणून अलिप्तृतावादी धोरणास महत्व आहे

अलिप्ततावादी धोरणाची वैशिष्टे
(१) लष्करी संघटना व लष्करी करारापासून अलिप्तता, (२) शांततेच्या धोरणाचा अवलंब (३) सहकार्य व सहजीवनाचे धोरण, (४) स्वातंत्र्य व सार्वभौमत्व यांचा अंगीकार (५) निर्भयतेचे धोरण (६) प्रसंगानुरूप कारवाई करण्याचे स्वातंत्र्य.
वरील वैशिष्टयांवर आधारित अलिप्त राष्ट्र चळवळीची वाटचाल सुरु झाली. भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु इजिप्तचे अध्यक्ष अब्दुल गमाल नासेर, युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष मार्शल टिटो यांच्या नेतृत्वाखाली अलिप्त राष्ट्र संघटना निर्माण झाली.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून पंडित नेहरुंनी सूत्रे हाती घेतली. पंतप्रधानपदाबरोबरच परराष्ट्र खात्याचा कार्यभारही नेहरुंनी आपल्याकडेच ठेवला नेहरुंना जागतिक इतिहासाची सखोल माहिती होती. तसेच आंतराराष्ट्रीय संबंधाची चांगली जाण होती. नेहरुंनी देशाच्या हितसंबंधाला अग्रक्रण देऊन आंतरराष्ट्रीय राजकारणात पंचशील धोरणाच्या माध्यामातून जागतिक शांतता व सहकार्य वृध्दिंगत केले. तर अलिप्ततेच्या धोरणाचा अवलंब करुन जागतिक राजकारणास विधायक वळण देऊन नवीन विचार रुजविला.
भारताच्या परराष्ट्र धोरणाची वैशिष्ट्रे :-

👉राष्ट्रहितास प्राधान्य
पंडित नेहरुंनी शेजारील राष्ट्रांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करत असतांना भारताच्या हितसंबंधाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणात सक्रिय असताना नेहरुंनी देशाचे हितसंबंध जपले.

👉जागतिक शांतता व सहकार्य
पहिल्या व दुसर्‍या महायुध्दमुळे जग होरपळून निघाले होते. असे विनाशकारी महायुध्द पुन्हा उदभवू नये यासाठी नेहरुंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता व सहकार्याचे महत्व विशद केले. शांततामय सहजीवना चा त्यांनी पुरस्कार केला.

👉स्वातंत्र्याचा पुरस्कार व स्वातंत्र्यालढयास सहाय्य
कोणतेही राष्ट्र पारतंत्र्यात राहू नये यासाठी त्यांनी स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. ज्या राष्ट्रामध्ये पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी चळवळी सुरु आहेत. त्यांना भारताने पाठिंबा व सहकार्य देऊ केले.

👉आफ्रो आशियायी राष्ट्रांना सहकार्य
पाश्चिमात्यांच्या आर्थिक व राजकीय साम्राज्यवादाला बळी पडलेल्या आफि्रका, आशिया, खंडातील राष्ट्रांनी परस्पर सहकार्याचे धोरण ठेवल्यास त्यांची उन्नती होऊ शकेल.

👉वसाहतवादास विरोध
आशिया आफि्रका खंडातील अनेक राष्ट्रे युरोपियनांच्या वसाहतवातदातून आपली मुक्तता होण्यासाठी धडपडत होती. त्यांनी वसाहतवादाच्या विरोधात उभ्या केलेलया संघर्षास नेहरुंनी पाठिंबा देऊ केला.

👉संयुक्त राष्ट्रसंघाला सहकार्य
विनाशकारी महायूध्दे पुन्हा होऊ नयेत, राष्ट्रा -राष्ट्रातील प्रश्न सामंजस्याच्या मार्गाने सुटावेत यासाठी संयुक्त राष्ट्र संघ निर्माण झाला होता. युनोच्या माध्यमातून नि:शस्त्रीकरण परिषदा दुर्बल राष्ट्रांना सहकाय्र अशा उपक्रमांनाभारताने सक्रिय साहाय्य केले. नेहरुंच्या काळात भारत युनोचा क्रियाशिल सदस्य झाला.

👉अलिप्ततेचे धोरण
पंडित जवाहरलाल नेहरुंच्या परराष्ट्र धोरणातील अलिप्ततेच्या धोरणास अत्यंत महत्वाचे स्थान आहे. या धोरणाच्या माध्यमातून त्यांनी जागतिक राजकारणाला विधायक वळण देऊन भारताला आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्वपूर्ण स्थान मिळवून दिले.

चिन सोबतच्या संघर्षानंतर काही दिवसात नेहरूजींची प्रकृती बिघडली, त्यानंतर २७ मे १९६४ ला ह्नदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. पंडित नेहरू लहान मुलांवर फार प्रेम करायचे आणि तेवढेच ते आपल्या देशाप्रती देखील समर्पित होते.

पं. नेहरूंचा मृत्यु भारता करता मोठे नुकसान होते यामुळे भारतियांना अतिशय दुःख झाले कारण प्रत्येकावर त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाची छाप सोडली होती. ते लोकप्रीय राजनेता होते त्यांच्या योगदानाला आणि त्यांच्या त्यागाला कधीही विसरता येणार नाही.

म्हणुन त्यांच्या स्मरणार्थ अनेक मार्ग, जवाहरलाल नेहरू शाळा, जवाहरलाल नेहरू टेक्नाॅलाॅजी युनिव्हर्सिटी, जवाहरलाल नेहरू कॅंसर हाॅस्पिटल बनविण्यास सुरूवात करण्यात आली.

त्यांचा मुख्य उद्देश त्यांच्या पंतप्रधान कार्यकाळात लोकतांत्रिक परंपरांना मजबुत करणे, राष्ट्राच्या आणि संविधानाच्या धर्मनिरपेक्षतेला स्थायीभाव मिळवुन देणे, योजनांच्या माध्यमातुन देशाच्या अर्थव्यवस्थेला सुरळीत करणे हा होता.

या संकल्पांनी आणि उद्देशांनी त्यांना महान बनविले ते सर्वांकरता प्रेरणादायी आहेत.

आज क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे २२६ वी यांची जयंती आहे. शासनाने आजच्या बालदिनाची आणि उद्याच्या बिरसा मुंडा जयंतीची आठवण करुन दिली पण लहुजीचे कार्यही अमोघ अशा स्वरुपाचेच आहे.

‘ जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी!’ अशी शपथ घेऊन हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी आजन्म देशसेवेत राहून क्रांतिवीर उमाजी नाईक, क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, क्रांतिवीर भाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, क्रांतिवीर चिमणाजी जाधव, क्रांतिवीर सदाशिवराव गोंवडे, क्रांतिवीर केरु नाना छत्रे, क्रांतिवीर नाना मोरोजी आणि १८५७ च्या क्रांतीसमर युद्धात शहीद झालेले हजारो अनामिक योद्धे वीर लहूजींनी निर्माण केले हेते. क्रांतिकारकांना घडकिणारे, समता स्वातंत्र्यासाठी वैचारिक वसा देऊन क्रांतिकारकांना पेटून उठण्याचे सामर्थ्य बहाल करणारे, हिंदुस्थानी स्वातंत्र्यासाठी लढा उभारणारे, गुलामगिरीविरुद्ध बंडाचा एक नवा विचार देणारे, हिंदुस्थानी स्वातंत्र्याच्या सशस्त्र क्रांतीचे जनक आद्य क्रांतिगुरू वीर लहूजी साळवे यांची आज जयंती. त्यांचे कार्य अजरामरच राहील.

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अशा अनेक व्यक्ती आहेत की, ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली, परंतु ते सर्व अनामिकच राहीले. असेच एक क्रांतिकारक आहेत वीर लहूजी वस्ताद साळवे. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १७९४ साली पुरंदर गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावी जन्मलेल्या लहूजींच्या घराण्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे.लहुजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे (राऊत) व आईचे नाव विठाबाई होते.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांनी लहूजी साळवेंच्या खापर पंजोबांना पुरंदर किल्ला रक्षणाची जबाबदारी दिली होती. या ऐतिहासिक घराण्यात लहूंजींचा जन्म झाला. शिवकालखंडानंतर लहूजींच्या पणजोबांना पुरंदर किल्ला सोडावा लागला. पुढे दुसर्‍या बाजीराव पेशव्यांच्या काळात लहूंजीचे वडील राघोजी यांनी पुरंदर परिसरात जिवंत वाघ पकडला ही बातमी दुसर्‍या बाजीरावांना समजली. त्यांनी लहूजींच्या वडीलांना बोलवून आपल्या शिकारखाना व शस्त्रागारप्रमूखपदी नेमले. राघोजी साळवे शस्त्रास्त्रनिपुण, शरीरयष्टीने वाघासारखे बलवान होते. लहुजींचे पूर्वज आपल्या शूरवीरतेमुळे पराक्रमी घराणे म्हणून ओळखले जात होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. त्यामुळे शिवरायांनी आपल्या कार्यकाळात लहुजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदार्‍या सोपविल्या होत्या. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना ‘राऊत’ या पदवीने गौरविले होते.

लहुजींचे घराणे शूरवीर, लढवय्ये असल्यामुळे राघोजींनी आपल्या लहुजीलादेखील एक वीर योद्धा बनविण्याच्या उद्देशाने लहानपणापासूनच तांबड्या मातीतील कुस्तीची , शस्त्रांची, युद्धकलेची तालीम दिली. त्यामुळे लहुजी दांडपट्टा फिरविणे, घोड्यावर स्वारी, भालाफेक, बंदूक चालविणे, तोफगोळे फेकणे, गमिनी काव्याने शत्रूला मात देणे, शत्रूंची गुप्त माहिती मिळविणे आदी युद्धकलांत तरबेज व पारंगत होते.
खडकी येथे ५ नोव्हेंबर १८१७ ला पेशव्यांचे इंग्रजांसोबत भयानक युद्ध झाले. १२ दिवस राघोजी व सळसळत्या तरुण रक्ताच्या २३ वर्षे वयाच्या लहुजी साळवेंनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. राघोजी साळवे या स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या समोर शहीद झाले. पेशव्यांचा पराभव झाला. हिंदवी स्वराज्याचे निशाण शनवारवाड्यावरून हटवून इंग्रजांचा युनियन जॅक फडकला.
स्वातंत्र्यप्रेम, देशभक्ती, देशप्रेमाने लहुजींना आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या दु:खातून सावरले. या पराभवाने लहुजींच्या हृदयात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्वाला भडकली. भारतमातेला इंग्रजांपासून वाचविण्यासाठी राघोजी साळवे शहीद झालेल्या ठिकाणी लहुजींनी १७ नोव्हेंबर १८१७ ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत ‘मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी’ अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून आपल्या वडिलांची समाधी (थडगे) उभारली. ही समाधी अजूनही ‘वाकडेवाडी’ येथे आहे.
आपल्या शूरवीर वडिलांचा मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव लहुजींना असह्य झाला. पराक्रमी घराण्यातील लहुजींनी इंग्रजांना शिकस्त देण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्ध कलाकौशल्याचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी १८८२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर, सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, उमाजी नाईक, फुले यांचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हेदेखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले.

साताराचे छत्रपती प्रतापसिंह यांना १८३९ मध्ये ब्रिटीश सरकारने पदच्युत केले. यांचा वचपा काढण्यासाठी नानासाहेब पेशवे, तात्या टोपे यांनी उत्तरेत तर रंगोबापू यांनी लहूजींच्या मदतीने सातार्‍यात ब्रिटीशांविरुध्द बंड करण्याचे ठरविले. १२ जून १८५७ ही तारीखही बंडासाठी निश्चित करण्यात आली. मात्र हा कट उधळला गेला. लहूजींचे ३०-३५ क्रांतिकारक ब्रिटीशांनी पकडले. उरलेल्या सैनिकांनी चिडून पुरंदरच्या मामलेदाराला ठार मारले. यामुळे ४ ऑगस्ट १८५७ रोजी कनय्या मांग, धर्मा मांग यांना तोफेच्या तोंडी देण्यात आले. हे दोघेही लहूजींचे सैनिक होते. तसेच बाकीच्या साथीदारांना फाशी देण्यात आली. ब्रिटीशांना या सर्व बंडकारांना लहूजींकडूनच प्रशिक्षण मिळत असावे असा संशय आल्याने लहूजींनी पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी पुणे सोडले. लहूजी बैराग्याच्या वेशात, तर त्यांचे सैनिक पोतराज, फकीर, ज्योतिषी बनले. व पोलिस चौकीसमोर बसून हालहवाल देऊ लागले. पुण्याबाहेर पडल्यानंतर लहूजींनी कृष्णाखोरे, वारणा खोरे, पालीचा डोंगर , सातारा, पन्हाळा या दुर्गम भागात प्रशिक्षण केंद्रे उभारली. लहूजींना फिरंग्याची राजवट उलटून टाकलेली पाहायचे होते.

१७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये आपल्या मायभूमीसाठी आजन्म व्रत स्वीकारलेल्या लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली व एका महाक्रांतिपर्वाचा शेवट झाला.
महापुरुष, समाजसुधारकांना घडविणारे लहुजी साळवे मात्र स्वत: उपेक्षितच राहिले. एखादी महान व्यक्ती देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वत:चे सर्वस्व अर्पण करते. मात्र ती व्यक्ती प्रसिद्धीपासून वंचित राहते. अशा महान व्यक्तीची जयंती व पुण्यतिथी कधी होऊन जाते हे लक्षातही येत नाही. आपले संपूर्ण आयुष्य खर्चून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढवय्यांची संघटना लहुजींनी उभी केली होती. १८५७ च्या स्वातंत्र्य लढय़ात त्यांनीच प्रशिक्षित केलेले तरुण अधिक होते. त्यांच्या या महान कार्याला तोड नाही. अशा या थोर क्रांतिगुरू वीर लहुजी वस्ताद या कट्टर राष्ट्रभक्ताला कोटी कोटी प्रणाम!

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय
१४.११.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *