कंधार ; दिगांबर वाघमारे
शासनाने 2005 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना पेन्शन योजना बंद केली आहे.त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याचे अपघाती निधन झाले तर त्यांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर येते. कुटुंबीयांना मोलमजुरी करून उदरनिर्वाह करण्याशिवाय पर्याय राहात नाही.अशाच योगेश बागुल या शिक्षकाचे काविळ आजाराने दुःखद निधन झाले. कुटुंब उघड्यावर आले ही बातमी वर्ग मित्रांना समजली आणि त्यांनी दीड लाख रुपयांची मदत कुटुंबियांना केली आहे.
शासनाने जुनी पेन्शन योजना ताबडतोब सुरू करावी अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.
ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारा एक, गुणी, अभ्यासू प्राथमिक शिक्षक योगेश सुभाष बागुल. रा.दहिवेल.साक्री.. जि.धुळे. हे के एम एस अध्यापक विद्यालय मिठबाव ता.देवगड जि. सिंधुदुर्ग येथे 2005 ते 2007 दरम्यान डीएडचा वर्गमित्र 2007 पासून जिल्हा परिषद कोल्हापूर येथे अतिशय दुर्गम भागात ज्ञानदानाचे कार्य करून नुकताच आंतरजिल्हा बदलीने व जिल्ह्यात रुजू झाला होता. अनेक स्वप्ने योगेश्वर कुटूंबियांच्या डोळ्यात तरळत होती.
परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते.आदिवासी समाजातून वर आलेल्या खडतर आयुष्याची झुंजणाऱ्या योगेश ची साध्या कावीळ आजाराशी झुंज अपयशी ठरली. आणखी एक डीसीपीएस धारक, प्रामाणिक शिक्षक,वर्गमित्र कुटुंबीयांना उघड्यावर टाकून काळाच्या पडद्याआड गेला.
परंतु योगेशच्या डीएडच्या सर्व जिगरबाज मित्राला त्याच्या कुटुंबाची परवड जाणवत होती. बळीराम जाधव, राजेश्वर दुंपलवाड, नितीन भोगे, अभिजीत मदे व इतर सर्व शिक्षक वर्गमित्रांनी पुढाकार घेऊन आपापल्या परीने आर्थिक सहकार्य करून योग्य त्या मुलाच्या नावे दीड लाखाची एफ डी केली तसेच त्याच्या संपूर्ण शिक्षणाचा भार उचलून भविष्य उजळण्याचे काम केले.
कोणत्याही प्रकारची केलेली मदत योगेश चिऊ निश्चितपणे भरून काढू शकणार नसली तरी या निमित्ताने वर्गमित्रांनी मित्र प्रेमाचा एक आदर्श समाजात घालून दिला.
1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय नोकरीत लागलेले,प्रामाणिकपणे काम करणारे असे अनेक डीसीपीएस धारकांनी कुटुंब उघड्यावर टाकून शासनाच्या अनास्थेचा बळी ठरत आहेत.जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या माध्यमातून शासनाची डीसीपीएस धारकांच्या लढा शेवटच्या श्वासापर्यंत सुरूच राहणार आहे.त्वरित शासनाने अन्याय कारक अंशदायी पेन्शन योजना बंद करून सर्व डीसीपीएस धारकांनी जुनी पेन्शन योजना लागू करणे आवश्यक आहे.या निमित्ताने तरी योगेशच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी अपेक्षा समाजातून व्यक्त होत आहे.
योगेश मित्रा…आयुष्याशी तुझी झुंज अपयशी ठरली तरी तुझे सगळे पाठीराखे तुझी लढाई जिंकण्यासाठी खंबीर आहेत याची खात्री बाळग…!शासनाला व इथल्या व्यवस्थेला सुद्धा आम्ही इतकेच सांगू इच्छितो..
करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची रणात आहेत झुंजणारे अजून सर्वकाही..
आमदार खासदार यांना एक टर्म पूर्ण केलं की आयुष्यभर पेन्शन मिळते पण शिक्षकांना मात्र पूर्ण आयुष्यभर ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांना वेगळा न्याय आहे.अनेक शिक्षक तर 2005 च्या अगोदर दहा-दहा वर्षे विनाअनुदानित तत्त्वावर काम करत होते 2005 नंतर अनुदान आले तरीही त्यांना पेन्शन नाही. यामुळे शिक्षकांबाबत खूपच अन्यायकारक धोरण आहे.
शासनाने ताबडतोब सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी शिक्षक मित्रा च्या वतीने करण्यात आली आहे.
*** योगेश साठी एक हात मदतीचा…*****
1.बळीराम जाधव- 5000/-
2.अमोल सोनवणे- 5000/-
- यश वाघ -5000
- किरण नागरे 5000
- इंद्रजित ढगे -5000
- राजेश्वर दुंपलवाड -3000
- नितीन कुलथे -5000
- राजेंद्र भापकर -5000
- राहुल घेवारे – 3000
- शेख फेरोज -3000
- देवाप्पा पालके – 3000
- शिवाजी नवले – 3000
- विशाल कुतवळ -5000
- भैरवनाथ जिरगे -5000
- शशीमोहन थूटे – 2000
- संजय पंदेरे – 3000
- नंदकुमार देशमुख -1000
- तय्यब इनामदार -3000
- सागर धप्पाधुळे -3000
- योगेश बनकर – 5000
- सुधाकर मूंगे- 3000
- .दत्ता करांडे – 1000
- .विनायक होनगेकर -1000
- श्रीकांत जाधवर -3000
- शेप हनुमंत – 3000
- सचिन थोरवे – 3000
- चंद्रकांत बाबर – 9000
- अशोक काशीद – 2000
- रुपेश पवार -2000
- शिवाजी राऊत -1000
- प्रकाश गायकवाड – 10000
- चंद्रकांत कदम – 3000
- योगेश गायकवाड – 3000
- अशोक माळवे -1000
- विशाल जाधव -1000
- सुरेश कांबळे -1000
- नानासाहेब यादव – 1000
- राम शिंदे -1000
- सागर यादव – 1000
- ज्ञानु डिंबळे -2000
- रतीला ठोंबरे – 3000
- रणजित दराडे-1000
- .ललिता ताई-500
- रोहिणी कट्टीमणी-1000
- संपदा बिर्जे-1000
- अंजनी पवार-1000
- नितीन भोगे-2000
- राधेशाम जोंधळे-1000
- प्रमोद नानजकर-500
- विनेश वळवी – 1000
- अभिजित मदे सर -1000
- प्रकश मुळे सर -1000
- राहुल भागवत -1000
- जितेंद्र भदाणे सर -1000
- विकास जाकापुरे सर -1000
- .स्वाती पवार मॅडम – 1000
- लक्ष्मण धर्मे -1000
- कल्पना आंबरे मॅडम -1000
- दिपाली कुंभार मॅडम -1000
स्मिता पारावे -1000
एकूण = 151000/-
Video News;