भोकर / प्रतिनिधी
केंद्र सरकाने शेतकऱ्यांच्या विरोधात कायदा केला असून त्या कायद्यात अधारभूत किंमतीचा उल्लेख नाही त्यामुळे केंद्रसरकारच्या नविन कायद्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याने महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा करून त्यांची अमलबजावनी करणार असल्याचे सांगून सर्व शेतकरी, व्यापारी, मतदार यांना हि दिवाळी सुख ,समाधान, प्रगतीची जावो अशा शुभेच्छा बाजार समितीच्या वतीने शेतकरी निवास मंगल कार्यालयात आयोजीत करण्यात आलेल्या पानसुपारी व चहा फराळ कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिल्या .
प्रथम क्रांती सुर्य जननायक बिरसामुंडा, मराठवाडयाचे भाग्यविधाते कै .डॉ . शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमांचे नामदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते पूजन करण्यात आले .बाजार समितीच्या वतीने सभापती, उपसभापती सर्व संचालक यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जि .प. सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, बाजार समितीचे अध्यक्ष जगदिश पाटील भोसीकर, नागनाथ धिसेवाड, गोविंद बाबा गौड पाटील, सुभाष पाटील किन्हाळकर, सतिश देशमुख , विनोद पाटील चिंचाळकर, राजू पाटील दिवशीकर ,गोविंद देशमुख, केशव पाटील पोमनाळकर . साहेबराव सोमेवाड यासह बाजार समितीचे सर्व संचालक यांची उपस्थिती होती .
पुढे बोलताना सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले देशासह राज्य कोरोनाच्या संकटाने आर्थिक अडचणीत असून यातून राज्य मार्ग काढत आहे .मी नुसत्या घोषणा करत नाही प्रत्येक कामासाठी निधी उपलब्ध करुन देत असतो अतिवृष्टीत सर्वच शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले त्या शेतकऱ्याना मदत म्हणून जिल्ह्यासाठी २८२ कोटीची मदत दिली आहे .बाजार समित्या सक्षम झाल्या पाहीजेत असे मत व्यक्त करून पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्य देऊन मंजूर योजना तातडीने मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या . यावेळी मागनाथ घिसेवाड , बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सभापती जगदिश पाटील भोसीकर यांनी केले .सुत्रसंचालन पत्रकार मनोज गिमेकर, आभार रामचंद्र मुसळे यांनी मानले . कार्यक्रमास व्यापारी, सरपंच,चेअरमन यांची मोठ्या संखेने उपस्थिती होती .