आशा फार्मस शेतकरी उत्पादक कंपनीचे आमदार शामसुंदर शिंदे व आशाताई शिंदे यांच्या हस्ते 16 नोव्हेंबर रोजी उद्घाटन

लोहा (प्रतिनिधी)

लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या तथा आशा फार्मस शेतकरी उत्पादक कंपनी च्या चेअरमन सौ .आशाताई शामसुंदर शिंदे यांच्या शुभहस्ते आज लोहा शहरातील टेलिफोन ऑफिस जवळ आशा फॉर्मस शेतकरी उत्पादक कंपनी चा भव्य उद्घाटन सोहळा दुपारी 2 वाजता संपन्न होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटक लोहा, कंधार मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या तथा आशा फार्मस शेतकरी उत्पादक कंपनी च्या चेअरमन आशाताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे,

या उद्घाटन कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर ,जिल्हा कृषी अधीक्षक चलवादे, सुरज ग्रुपचे चेअरमन रमेश पारसेवार, लोह्याचे नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, कंधारच्या नगराध्यक्षा सौ .शोभाताई नळगे ,लोहाचे तहसीलदार विठ्ठल परळीकर, कंधार चे तहसीलदार विजय चव्हाण, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रावसाहेब पाटील शिंदे हळदेकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य बालाजीराव वैजाळे ,कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर पाटील चौडे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन स्वप्निल उमरेकर यांच्या विशेष उपस्थितीत लोह्यात आशा फार्मस शेतकरी उत्पादक कंपनी चा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे .

आशा फार्मस शेतकरी उत्पादक कंपनी लोहा, कंधार मतदार संघातील शेतकऱ्यांना सर्व प्रकारचा शेतीमाल, कडधान्य, धान्य आदि आशा फार्मस शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत खरेदी करण्यात येणार असून लोहा, कंधार मतदार संघातील शेतकऱ्यांना आशा फार्मस शेतकरी उत्पादक कंपनी कडून शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते ,शेती औषधी, शेती अवजारे ,पीव्हीसी पाईप, ठिबक पाइप ,एचडीएफसी पाईप, ट्रॅक्टर, शेती उपयोगी साहित्य, लोहा ,कंधार मतदार संघातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे आशा फार्मस शेतकरी उत्पादक कंपनी च्या चेअरमन तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी सांगितले, या उद्घाटन कार्यक्रमास लोहा, कंधार मतदार संघातील तमाम शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन लोहा ,कंधार विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे व आशा फार्मसच्या चेअरमन तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी मतदारसंघातील शेतकरी बांधवांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *