शिवसेना प्रमुखांना कंधारात अभिवादन


कंधार – ता. प्र. – १७


कंधार – हिन्दुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कंधार शिवसेनेतर्फे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सभागृहात अभिवादन करण्यात आले होते.


शिवसेनेचा आज सर्वात दुःखाचा दिवस. ह्याच दिवशीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या शेवटच्या घटका सोडल्या. प्रत्येक शिवसैनिक आपल्या नेत्या मानवंदना करतोच.पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी कोरोना मुळे शिवसैनिकांनी आपापल्या ठीकाणावरूनच शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्याचे आवाहन केले त्यानुसारच कंधार शिवसेना तर्फे शहरातील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सभागृहात अभिवादन करण्यात आले.

यावेळी लोहा-कंधार विधानसभा संघटक गणेश कुंटेवार,माजी शहरप्रमुख मारोती पढरे,शहरप्रमुख बाळू पाटील लुंगारे,पंचायत समिती सदस्य उतम चव्हाण, नगरसेवक आरूण बोधनकर, निरंजन वाघमारे,शाखाप्रमुख व्यंकट कांबळे, कैलास कांबळे, रविराज जाधव,राजु पाटील, संकेत आंबेकर,कैलास कांबळे, साईनाथ मलगे,अजिंक्य यन्नावार, मनोज मोरे, अजय कांबळे, भवमनोज कांबळे, लखन सुर्यवंशी, रणधीर कांबळे, राहुल घोडजकर, संदीप गवाले,अविनाश फूले, विजय वाघमारे, ऋषीकेश राजकौर, माधव रोकडे, सुनील कांबळे यांची उपस्थिती होती. यावेळी गणेश कुंटेवार, उतम चव्हाण, मारोती पंढरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जिवनवर विचार मांडले.कार्यक्रमाच्या सुरवातीला साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे व लहुजी साळवे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.शेवटी आभार मारोती पढरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *