लोहा-कंधार( प्रतिनिधी)
लोहा शहरा जवळील पारडी येथे सोमवार दि. 16 रोजी आशा फार्मस शेतकरी उत्पादक कंपनी चा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला ,
यावेळी आशा फार्मसच्या चेअरमन व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे, सुरज ग्रुपचे चेअरमन रमेश सावकार पारसेवार, जिल्हा नियोजन समिती सदस्य रावसाहेब पाटील शिंदे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन स्वप्नील पाटील उमरेकर, जि. प. सदस्य चंद्रसेन पाटील, कंधार कृ. उ. बा. समितीचे सभापती ज्ञानेश्वर पाटील चौडे, अशोक पाटील गायकवाड, श्याम आण्णा पवार, हर्षद शहा ,गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष सूरर्जीत सिंह कामठेकर, युवा नेते रोहित पाटील शिंदे, नगरसेवक जीवन चव्हाण, प्रगतिशील शेतकरी गोपाळ पाटील इजळीकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती ,यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आशा फार्मस शेतकरी उत्पादक कंपनी च्या चेअरमन तथा सामाजिक कार्यकर्त्या आशा ताई शिंदे म्हणाल्या की लोहा, कंधार मतदार संघातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आशा फार्मस कंपनीच्या एकाच छताखाली शेतीविषयक सर्व गरजा पूर्ण करून शेतकऱ्यांना स्वावलंबी व आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठीच आशा फार्मस शेतकरी उत्पादक कंपनी ची स्थापना करण्यात आल्याचे आशा फार्मस च्या चेअरमन आशाताई शिंदे यांनी यावेळी सांगितले.
लोहा ,कंधार मतदार संघातील ऊसतोड कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी परराज्यात व मोठ्या शहरात दरवर्षी स्थलांतर करतात हि दुःखद बाब असल्याचे सांगत यापुढे लोहा, कंधार मतदार संघातील एकही नागरिक स्वतःचे गाव सोडून परराज्यात,व बाहेर गावी शहरात काम शोधण्यासाठी जाणार नसल्याचे नियोजन असून प्राथमिक स्वरूपात मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हितासाठी व रोजगार निर्मितीसाठी हळदा येथे गूळ कारखान्याची स्थापना करण्यात येणार असल्याचेही यावेळी आशा फार्मसच्या चेअरमन आशाताई शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले ,लोहा, कंधार मतदार संघातील शेतकऱ्यांचा कापूस धर्माबाद केंद्रावर खरेदी करताना शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला होता, मी वेळोवेळी धर्माबाद व इतर कापूस खरेदी केंद्रांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत सोडवल्या आहेत, पण शेतकरी स्वतःच्या शेतीत प्रचंड मेहनत करून कापूस विक्रीच्या वेळी मतदारसंघातील शेतकऱ्यांना होणारा प्रचंड मनस्ताप टाळण्यासाठी लोहा, कंधार मतदार संघामध्ये नूतन दोन जिनिंग-प्रेसिंग कंपन्या उभारल्या जाणार असून या जिनिंग फॅक्टरी मुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल असेही चेअरमन सौ. आशाताई शिंदे यांनी सांगितले .आशा फार्मस शेतकरी उत्पादक कंपनी च्या निर्मिती मागे लोहा ,कंधार मतदार संघातील शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागती पासून ते शेतातील मोठ्या कष्टाने पिकवलेला शेतीमाल विक्री पर्यंत च्या सर्व बाबींच्या गरजांची पूर्तता आशा फार्मस शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून केल्या जाईल व येणाऱ्या काळात मतदारसंघातील सर्वसामान्य शेतकरी ,कष्टकरी सुशिक्षित बेरोजगारांच्या विकासासाठी उर्वरित जीवन समर्पित करीत असल्याचेही यावेळी आशा फार्मस च्या चेअरमन आशाताई शिंदे यांनी स्पष्ट केले. लोहा, कंधार मतदार संघातील शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी व पेरणीसाठी आशा फार्मस शेतकरी उत्पादक कंपनी आर्थिक मदत करणार असून आशा फार्मस शेतकरी उत्पादक कंपनी मतदारसंघातील शेतकऱ्यांना मुबलक दरात बी-बियाणे, खते, औषधे ,ठिबक सिंचन, पि. व्ही.सी पाइप, तुषार सिंचन, औषधी फवारणी, एचडीएफसी पाईप ,शेती अवजारे, ट्रॅक्टर ,शेती उपयोगी साहित्य हे लोहा, कंधार मतदार संघातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना आशा फार्मसच्या एकाच छताखाली सुलभ उपलब्ध करून दिल्या जाईल तरी लोहा, कंधार मतदार संघातील सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आशा फार्मस शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आपल्या शेतीचा विकास करून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न आशा फार्मस शेतकरी उत्पादक कंपनी करणार असल्याचे आशा फार्मसच्या चेअरमन तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी उपस्थितांना बोलताना केले,
यावेळी या कार्यक्रमास लोहा, कंधार मतदार संघातील मोठ्या संख्येने शेतकरी बांधव सामाजिक अंतराचे पालन करत उपस्थित होते ,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश पाटील नंदनवनकर यांनी केले .