कंधार येथे निखिल लातूरकर यांच्या नागरी सत्काराचे आयोजन


कंधार; प्रतिनिधी


अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष व ब्रह्म शिखर परिषदेचे अध्यक्ष निखिल लातूरकर यांच्या नागरी सत्काराचे आयोजन मंगळवार 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान कंधारच्या साधू महाराज संस्थान मठात आयोजित केला जाणार आहे.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश देशपांडे हे असणार आहेत.
ब्रह्म शिखर परिषदेच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याने श्री लातूरकर यांचा नागरी सत्कार करण्यात असल्याची माहिती अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोज गाजरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.


या सत्कार कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शाखेचे पदधिकारी
गजानन महाराज, गजानन पाठक, सुहास दिग्रसकर, अरुण पांडे, अनिरुद्ध पुराणिक,दिपाली दिग्रसकर, वर्षा कुरुळेकर,स्नेहा वडवळकर, रुपाली धोंड,प्रज्ञा परळकर मनिषा पांडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *