शिक्षकाने राबविला कोल्हापूर पॅटर्न
कंधार ; प्रतिनिधी
वळसंगवाडी हे गाव मंगलसांगवी केंद्रातील कंधार तालुक्यापासून १५ कि. मी. अंतरावर असणारे ३०० ते ४०० लोकवस्तीचे गाव . व्दिशिक्षकी शाळा एकूण पट संख्या जेमतेम ४० ते ४२. गेले पाच ते सहा वर्षापासून नेहमी शिक्षण क्षेत्रात नावलौकिक असणारी शाळा .
सन २०१३ – २०१४ मध्ये ह्या शाळेत कोल्हापूर जिल्ह्यातुन जिल्हा बद्ली करुन वळसंगवाडी शाळेत रुजु झालेले हानमंत जोगपेटे सर.ज्यावेळेस जोगपेटे सर शाळेत हजर झाले तेंव्हा.शाळेची शैक्षणिक प्रगती जेमतेम पण सर हजर झाल्यानंतर मुख्याध्यापक व शिक्षक अशा दोन्ही भूमिकेत काम करताना गुणवत्ता वाढ व शालेच्या विकासासाठी खुप मेहनत घेतली व कोल्हापूर पॅटर्न राबविण्यास सुरुवात केली .
२०१४ -२०१५ मध्ये शाळेचा शैक्षणिक दर्जा व अंतर्गत विकास केला व गुणवत्ता वाढ करण्यात आली त्यानंतर केलेल्या दोन वर्षांचा अनुभव घेवुन ग्रामस्थांच्या मदतीने सन २०१५- २०१६ मध्ये कंधार तालुक्यातील पहिली डिजिटल शाळा करण्यचा बहुमान मिळाला . त्याच दरम्यान अभिमन्य काळे ( CEO जि प नांदेड )यांनी शाळेला भेट देवुन शाळेविषयी शिक्षक हानमंत जोगपेटे यांचे खुप अभिनंदन व त्यांच्या कार्याविषयी समाधान व्यक्त केले होते.
त्यानंतर २०१६- २०१७ मध्ये इयत्ता दुसरी मधील विद्यार्थी श्रेया व MTS परीक्षेत तालुक्यात प्रथम यश मिळवण्यात आले . त्यानंतर सलग तीन वर्षे श्रेया परीक्षेत शाळेचे ६ ते ८ विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आणण्याचे कार्य केले . व सन २०१९-२०२० मध्ये शिष्यवृत्ती व नवोदय सारख्या परीक्षेत एकुण 8 विद्यार्थी बसले होते त्यापैकी दोन विद्यार्थी कृष्णा लक्ष्मण जाधव व श्रीनिवास विष्णुकांत जाकापुरे हे विद्यार्थी नवोदय विद्यालयात पात्र व दोन विद्यार्थी कृष्णा लक्ष्मण जाधव व राजकुमार मोहन जाधव हे विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता धारक झाले आहेत.
तसेच शाळेमध्ये तंबाखूमुक्त शाळा अभियान राबवले व विविध उपक्रम राबवुन शाळा नावारुपास आणण्याचे काम हानमंत जोगपेटे यांनी केले .
ह्या सर्व कार्यासाठी गावातील ग्रामस्थ ,सरपंच तसेच कंधार तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के साहेब , बीट चे विस्तार अधिकारी कैलास होनधरणे,मंगलसांगवी केंद्राचे केंद्रप्रमुख एन. एम. वाघमारे व शाळेच्या मु.अ.भंडारे मॅडम यांचे खुप मार्गदर्शन मिळाले असल्याची प्रतिक्रिया शिक्षक हानमंत जोगपेटे यांनी दिली आहे.
****** प्रतिक्रिया ;
कंधार तालुक्यातील वळसंगवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एक नावीन्यपूर्ण व डिजिटल शाळा असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बालवयातच स्पर्धा परीक्षेचे धडे देणाऱ्या धडपडे शिक्षक श्री जोगपेटे हनुमंत व मुख्याध्यापिका यांच्या पुढाकारातून होत असल्याने विविध परीक्षेमध्ये या शाळेचे विद्यार्थी नेहमी चमकतात .येणाऱ्या काळात या वळसंग वाडी चे विद्यार्थी उच्चपदस्थ होतील .सदरील शाळेची गुणवत्तापुर्ण वाटचाल आहे.
गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, कंधार