टेलिव्हिजन उपकरणाचा मागोवा , जागतिक टेलिव्हिजन दिनाच्या निमित्ताने!

हल्ली विश्वातील प्रत्येक जन या टेलिव्हिजन उपकरना पुढे बसून लाईव जगातील कानाकोपरा पहातो तो टेलिव्हिजन या माध्यमातून कोणी ईडियट बाॅक्स म्हणते तर,कोणी नाॅलेज बाॅक्स म्हणतो! पण जाॅन लोगी बेअर्ड यांनी ही किमया प्रारंंभ 1923 ला तर पुुुर्ण संशोधन ३० सप्टेंबर १९२९ रोजी ११ दुुुुपारी यशस्वी! आज त्या संशोधनाचा आपण लाभ घेतो.

19 व्या शतकांच्या उत्तरार्धात अन् 20 व्या शतकाच्या आरंभी टेलिव्हिजन बनविण्यात यश आले. फिलो टी फन्सवर्थ,चार्ल्स फ्रान्सिस जेनेटिन्स ब्लादिमीर कोस्मा इकोटिकीन यांनी व्यावसायिक टेलिव्हिजन बनविण्यात 1927 साली यश आले.आपण जगभरातील ठळक घटना बातम्यांच्या स्वरूपात आपण घरच्या दिवाणखान्यात बसून पाहतो.जगात चालत असलेले मैदानातील बैठे खेळ सुरु असलेले लाईव पाहतो.मनोरंजनाचे सिनेमे,मालिका,न्युज चॅनलन्स ही किमया होते कशी? ती केली कोणी? तो होता- जॉन लोगी बेअर्ड! टेलिव्हिजन शब्दाची उत्पत्ती ग्रीक व लॅटीन या दोन भाषांतील शब्दांचे एकत्रीकरण होऊन झाली आहे.

‘टेली’ या ग्रीक शब्दाचा अर्थ दूरचे तर व्हिजिओ या लॅटीन शब्दाचा अर्थ दृष्टी. त्यावरून दूरचं दाखविणारा तो टेलिव्हिजनचा खोका होय आणि त्याला अतिशय समर्पक भारतीय नाव आहे-दूरदर्शन. १९२० साली यांत्रिकी करामतीमधून सुरू झालेला याचा प्रवास आज त्रिमिती प्रतिमा दाखवणाऱ्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रापर्यंत झाला आहे. केवळ पृथ्वीवरच्याच नव्हे, तर अवकाशातल्या परग्रहांवरच्या हालचालीसुद्धा आपण घरबसल्या पाहू शकतो आहोत ते याच तांत्रिक प्रगतीमुळे.८० दशकांच्याच्याश शेवटच्या टप्प्यात म्हणजे १९८८ नंतर रामायण या मालिकेने या उपकरणाला भारतभर कानाकोपर्यांत पोहंचले. २०१३ च्या आकडेवारीनुसार, जगातील ७९ % लोकांकडे दूरदर्शन संच होता.

आज आपण पाहतो.अन्न,वस्त्र,निवारा,बंगला,टेलिव्हिजन, मोबाईल या षटकांचा बोलबाला दिसतो.मार्च १९९६ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात जागतिक टेलिव्हिजन दिन साजरा करण्याचे सर्वानुमते पारित करण्यात आले.सध्या आपण पाहतो की,रिमोट कंट्रोल सहित एल.सहित.एल.सहित.डी.चा प्रकार ही एक टेलिव्हिजन क्षेत्रात क्रांतीचे पाऊल दिसते.एव्हढेच काय आता ऑनराईड टेलिव्हिजन युग आहे.एका ठिकाणाहून आपण चालू व बंद करुन मनाला वाटेल ते चॅनल बदलू शकता.
ही क्रांतीच मनोरंजन व विश्वातील माहिती देवू शकते.

dattatrya yemekar
dattatrya yemekar


गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी,
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *