एकाच विषयासाठी तीसऱ्यांदा उपोषन; बिलोली नगरपालिकेतील प्रकार

एकाच विषयासाठी तीसऱ्यांदा उपोषन;
  बिलोली नगरपालिकेतील प्रकार

बिलोली:नागोराव कुडके


बिलोली नगरपरिषद कार्यालय बिलोली नुतन इमारतीसमोर 60 लक्ष निधीचा वापर करीत अनावश्यक,पैसाचा अपव्यय व नियमांना डावलुन केवळ भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने बांधण्यात येणाऱ्या रस्ता व नाली च्या कामाची पुर्ण चौकशी करून निविदाच रद्द करावी या मागणीसाठी पञकार तथा सामाजिक कार्यकर्ता मुकिंदर कुडके यांनी तीसऱ्यांदा बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत .बिलोली नगरपालिकेतील वाढता भ्रष्टाचार लक्षात घेता मुकिंदर कुडके यांनी आपले पहिले उपोषन दि. 03/07/2019 रोजी केले.त्यावेळेस त्यांना सदर बाब जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येईल असे लेखी आश्वासन त्यानंतर लगेच काही महिण्यानंतर संधी साधत ठेकेदार काम चालु केल्यानंतर मुकिंदर कुडके यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषन केले असता तत्कालीन जिल्हादंडाधिकारी यांनी जिल्हा प्रशासनास कार्यवाही करण्यास सुचना व त्याचे लेखी पञ उपोषणकर्त्यास दिले व नंतर काम बंद झालं नंतर कोरोणासारखी महामारी असताना व लॉकडाऊनचा फायदा घेत ठेकेदार,अध्यक्षा व अभियंता यांच्या संगनमताने काम चालु करण्याच्या बेतात होते त्यानंतर काम चालु सुध्दा केले सदर बाब सामाजिक कार्यकर्ते मुकिंदर कुडके यांच्या लक्षात येताच त्यांनी तालुका दंडाधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर या प्रकरणाची माहिती दिली त्यानंतर मुकिंदर कुडके यांनी ठेकेदारानी जिल्हादंडाधिकारी यांचे (पञ क्र.2020-आरबी-1-डेस्क-2-टे-(4)-उपोषन-कावी-दिनांक25/01/2020) पञाचा मान न ठेवल्याचा आक्षेप घेत व सदर कामाची निविदाच रद्द व्हावी म्हणुन नगरपरिषद कार्यालय बिलोली च्या समोर बेमुदत उपोषन चालु केले अद्याप कोणतीही फौजदारी स्वरूपाची कार्यवाही ठेकेदार,अभियंता व अध्यक्ष यांच्यावर झाली नसून उपोषन करत्याला न्याय कधी मिळणार याकडे सर्व बिलोली वासियांचे लक्ष लागले आहे मुकिंदर कुडके यांनी या आपल्या तिसऱ्या उपोषनात वरील मागणीसहीत महराष्ट्र नगर परिषद औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील कलम 308 नुसार तसेच 308(1) च्या तरतुदीत दि 31-03-2018 च्या अधिनियम क्रमांक 25 अन्वये कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मुकिंदर कुडके यांनी केली आहे आणि ठेकेदार,अभियंता व अध्यक्षा यांच्या वर फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात यावे व मे.स्वामी नरेंद्र कंस्ट्रक्शनला ब्लँक लिस्ट(काळ्या यादित)मध्ये समाविष्ट करण्यावी यावे ही सुध्दा मागणी केली आहे बिलोली नगरपरिषदेचा भ्रष्ट कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे बिलोली नगरपरिषद ही जिल्ह्यातील वादग्रस्त नगरपरिषद ठरत आहे.अनावश्यक कामे होत असल्यामुळे नरपरिषदेसमोर उपोषण सुरु करण्यात आले आहेवादग्रस्त प्रकरणामुळे बिलोली नगरपालिकेमध्ये एकही मुख्याधिकारी काम करण्यात धजावत नाही.या ना त्या कारणाने वादग्रस्त ठरलेल्या नगरपरिषदेसाठी कोणीही मुख्याधिकारी येण्यासाठी तयार नाही.एका वर्षामध्ये सहा मुख्याधिकारी यांनी नरपरिषदेचा तात्पुरता पदभार घेवून सोडला आहे.एका वर्षामध्ये एवढे मुख्याधिकारी पदभार घेण्याची राज्यातील पहिलीच नगरपरिषद असेल.नायब तहसिलदार ओमप्रकाश गोंड यांच्याकडे दुसऱ्या वेळेस मुख्याधिकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे.बिलोली नगरपरिषदे समोरील अनावश्यक नाली व रस्त्याचे बांधकाम सुरु केल्याने गेल्या एक वर्षापूर्वी जिल्हाधिकारी यांनी काम बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.परंतु लॉकडाऊन चा फायदा घेत मुख्याधिकार्यांच्या गैरहजेरीमध्ये अभियंता व गुत्तेदाराच्या संगनमताने काम सुरु आहे.हे काम सुरु होताच सामाजिक कार्यकर्ते मुकींदर कुडके यांनी पुन्हा उपोषणाचा मार्ग अवलंबला.नगरपरिषदेचे काम हे नगराध्यक्षांचे पतीच सांभाळत असल्यामुळे मनमानीपणा वाढत आहे.मुख्याधिकारी व कर्मचारी भितीच्या वातावरणात वावरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *