अहमदपूर पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार सुनील कांबळे यांना ५० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले;
लातुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कार्यवाही
अहमदपूर ( गोपाळ काळे )
येथील तहसील कार्यालयात वर्ग-२ पदावर कार्यरत असलेले पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार सुनील कांबळे वय ४९ वर्ष यांनी हाडोळती येथील तक्रारदार यांचे रास्त भाव राशन दुकानावर कार्यवाही होऊन लायसन रद्द झाल्यामुळे तक्रारदार यांचे विनंती प्रमाणे शिधापत्रीका धारकांची गैरसोय होऊ नये म्हणुन तक्रारदार यांचे राशन दुकान उमरगा येल्लादेवी व आनंदवाडी यांच्या राशन दुकानास सलंग्न केली व दुकानाचे लायसन्स परत मिळवुन देण्याच्या कामात मदत करतो म्हणुन ५० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातुर यांनी दि ५ ऑगष्ट रोजी दुपारी ३.३१ वाजता पुरवठा विभागाच्या कार्यालयात रंगेहात पकडण्यात आले असुन सदरील लोकसेवका विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे याविषयी सविस्तर माहीती अशी की, अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथे तक्रारदार यांचे राशन दुकान असुन काही दिवसापूर्वी दि १९ मे रोजी तक्रारदार यांच्या दुकानातला १०० कट्टे तांदुळ काळ्या बाजारात विक्रिसाठी जात असताना तहसीलदार यांना मिळालेल्या गुप्त माहीतीवरून या कार्यालयाचे पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार सुनिल कांबळे यांना पाठवुन वाहनासह मुद्देमाल जप्त करुन सदरील दुकानावर कार्यवाही होऊन लायसन्स रद्द झाल्यामुळे हाडोळती येथील तक्रारदार यांच्या विनंती प्रमाणे शिधापत्रिका धारकांची गैरसोय होऊ नये म्हणुन तक्रारदार यांचे राशन दुकान उमरगा येल्लादेवी येथील सोमवंशी व आनंदवाडी (हाडोळती) येथील कबीर यांच्या राशन दुकानास सलंग्न केली व दुकानाचे लायसन्स परत मिळवुन देण्याच्या कामात मदत करतो म्हणुन ५० हजार रुपये पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आरोपी लोकसेवक नायब तहसीलदार सुनील कांबळे यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम देण्यासाठी तक्रारदार यांना दि ५ ऑगष्ट रोजी तहसील कार्यालय अहमदपूर येथे पाठवीले असता सदरील आरोपीने ५० हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम दुपारी ०३ .३१ वाजता पंचासमक्ष तहसील कार्यालय अहमदपूर येथील पुरवठा विभागाच्या कार्यालयात खतःहा स्विकारली म्हणुन त्यांना लातुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने रंगेहात पकडण्यात आले आहे सदरील लोकसेवक आरोपीविरुद्ध अहमदपूर पोलीस स्टेशन येथे कलम ७, ला.प्र.का अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपअधिक्षक माणिक बेद्रे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातुर हे करीत आहेतसदरील सापळा यशस्वी करण्यासाठी कल्पना बारवकर, पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परीक्षेत्र, नांदेड अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्र, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक मानीक बेद्रे, पोलीस निरीक्षक कुमार दराडे, बाबासाहेब काकडे, पोह संजय पस्तापुरे, लक्ष्मीकांत देशमुख, पोना चंद्रकांत डांगे, मोहन सुरवसे, मपोना शिवकांता शेळके, संतोष गिरी, शिवशंकर कच्छवे, आशिष क्षीरसागर , अमोल शिंदे, संदीप जाधव, दिपक कलवले, मपोशी रूपाली भोसले,चापोना राजु महाजन, आदींनी मोलाचे सहकार्य केले