कंधार ;प्रतिनिधी
पदवीधर मतदार म्हणजे काय यांची साधे पदे भोगलेल्यांना आमदारांना नाही ,पोलीस ,पत्रकार ,व्यापारी,डॉक्टर देखील पदवीधर आहेत. गैरमार्गाने निवडून येवून पदवीधर मतदारांना गृहीत धरुन जो आतापर्यंत होत होते ते आता होणार नाही . मराठवाडा पदवीधर मतदार निर्मिती झाली तेव्हापासून आजपर्यंत सभागृहात निवडून गेलेल्या वेगवेगळ्या आमदारांनी पदवीधरांना न्याय देणे तर दूरच पण विधान परिषदेत पदवीधरांचा साधा प्रश्न सुद्धा मांडला नाही.आता पदविधरांचे सर्वच प्रश्न सोडवण्यासाठीच मला उमेदवारी दिली असल्याचे प्रतिपादन कंधार येथे दि.२७ रोजी पत्रकार परिषदेत औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणूक 2020 चे अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर आत्माराम मुंडे यांनी केले आहे.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की आपण मला संधी दिल्यास पदवीधर सरपंच, शिक्षकेतर कर्मचारी, लिपिक, शिपाई ,प्रेरिका ,प्रेरक ,सेवा केंद्र, चालक ,आपले सरकार केंद्र चालक ,वैद्यकीय, कृषी ,अभियांत्रिकी ,आश्रम शाळा, वस्तीशाळा, निवासी शाळा, अध्यापक, शिक्षक ,आयसीटी शिक्षक ,इंग्रजी शाळा ,अंशकालीन कर्मचारी ,पोलीस ,पत्रकार, डॉक्टर, कृषी सहायक ,ग्रामसेवक ,तलाठी, लिपिक ,बांधकाम ,महसूल विभाग, विद्युत मंडळ आदी सह सर्व क्षेत्रातील पदवीधरांचे सहा वर्षात विधान परिषदेत प्रश्न सोडवण्यासाठी जिवाचे रान करीत. मला मतदाराने संधी द्यावी असे आवाहन यावेळी औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणूक 2020 चे अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर आत्माराम मुंडे यांनी केले आहे. कार्यक्रमाला आनंद गोडबोले गोविंद गर्जे,प्रकाश गोलेवार, गजानन जाधव, माधव गीते, जळबा बातलवाड, संग्राम डिकडे, तुळशीराम बोईनवाड ,नितीन जोंधळे, निलेश मुंडे, अर्जुन मुंडे, मनोज घोडके, बापूराव जगताप आदी सह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
****- video news*****