कंधार ; मो.सिकंदर
कंधार तहसिलदार हे पद काहि महिन्यापासुन रिक्त होते.प्रभारी तहसिलदार म्हणून विजय चव्हाण यांनी धुरा सांभाळली. कंधार तहसील ला आता कायमस्वरुपी तहसीलदार मिळाला असुन आज व्यंकटेश मुंडे यांनी पदभार स्विकारला आहे. श्री.मुंडे हे उदगीर येथून कंधार तहसीलदार म्हणून नव्याने रुजू झाले आहेत.
कंधार चे तत्कालीन तहसीलदार सखाराम मांडवगडे यांची प्रशासकीय बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी कंधार चे भूमिपुत्र नायब तहसीलदार विजय चव्हाण यांना कंधार तहसीलदार पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आले होते.
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे कार्यरत असलेले व्यंकटेश मुंडे यांची कंधारचा रिक्त असलेल्या पदावर प्रशासकीय बदली कंधार येथे करण्यात आली. व्यंकटेश मुंडे यांनी आज दिनांक २८नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी पी.एस. बोरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिरिक्त तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडून कंधार तहसीलचा तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर. व्यंकटेश मुंडे यांचे शाल श्रीफळ देऊन कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी बोरगावकर ना.तह.विजय चव्हाण,ना.तह. राजेश पाठक, ना.तह. नैना कुलकर्णी, पुरवठा ना.तह. यस. व्ही. ताडेवाड सह कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.