कंधार प्रतिनिधी
लोहा येथिल उपजिल्हा रुग्णालयास माजी सैनीकांनी दिनांक 27नोव्हेबर रोजी शहिद संभाजी कदम यांचे नाव दिले होते. परंतु प्रशासनाच्या वतिने हे नाव काढण्यात आले आहे.विशेष बाब म्हणजे दिनांक 30नोव्हेबर रोजी संभाजी कदम यांचा शहिद दिवस आहे. प्रशासनाच्या या भुमीकेमुळे माजी सैनिक आक्रमक झाले असुन शहिद संभाजी कदम यांचे नाव नाही दिले तर दिनांक 30नोव्हेबर रोजी लोहा येथिल उप जिल्हा रुग्णालयासमोर आत्मदहण करणार असल्याचा ईशारा त्रिदल संघाटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी दिला आहे.
नांदेड जिल्ह्यातील जानापुरी या गावातील शहिद संभाजी कदम यांचा दिनाक 29 नोव्हेबर रोजी शहिद दिवस आहे.त्यांच्या आठवणी स्मरणात राहव्या यासाठी लोहा उपजिल्हा रुग्णालयास शहिद संभाजी कदम यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी माजी सैनिक गेल्या आठ महिन्यापासुन केली जात आहे. या मागणीला प्रशासनाच्या वतिने म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने माजी सैनिकांनी अंदोलनाचे हत्यार उपसले उपसुन दिनांक 27नोव्हेबंर रोजी लोहा येथिल उपजिल्हा रुग्णालया समोर महाराष्ट्रातील माजी सैनिकांनी लोहा येथिल उप जिल्हा रुग्णालया समोर धरणे अंदोलनाला बसुन माजी सैनिकांनी या रुग्णालयाला शहिद संभाजी कदम यांचे नाव दिले होते परंतु प्रशासनाच्या वतिने हे नाव काढण्यात आले असल्याने माजी सैनिक आक्रमक झाले असुन बालाजी चुकलवाड यांनी नाव द्या अन्यथा दिनांक 30नोव्हेबर रोजी 11वाजता रुग्णालया समोर अत्मदहण करणार असल्याचा ईशारा दिला आहे.या आत्मदहणाचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना देण्यात आले आहे.