पदवीधर मतदान केंद्र व कोणत्या अनु क्रमांकावर मतदान आहे हे पाहण्यासाठी

पदवीधर मतदारांनी आपले मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपले नाव कोणत्या मतदान केंद्रावर व कोणत्या अनु क्रमांकावर आहे हे पाहण्यासाठी महाराष्ट्र शासनाची https://ceo.maharashtra.gov.in/gtsearch1/ या वेबसाईटवर आपले पूर्ण नाव टाकून सर्च करावे असे आवाहन करण्यात आले आहे.


कंधार तालुक्यात ४ हजार १४९ पदवीधर मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; ९ मतदान केंद्र सज्ज

कंधार ; प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यात पदवीधर निवडणुकी बाबत निवडणूक आयोगाने जाहिर केल्याप्रमाणे दि.१ डिसेंबर रोजी होणाऱ्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी कंधार तालुक्यातील पदवीधर मतदार पुरुष मतदार ३ हजार ४२२ तर स्त्री मतदार ७२७ असे एकूण ४ हजार १४९ मतदार कंधार तालुक्यातील शहरातील ३ तर ग्रामिण भागातील ६ असे एकूण ९ मतदान केंद्रावर आपले मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

प्रत्येक बुथावर चार कर्मचारी प्रमाणे ३६ कर्मचारी व ४ झोनल अधिकारी ,आरोग्य अधिकारी पथक, पोलीस पथक मतदान साहित्य घेवून तहसिल कार्यालाय येथून दि.३० नोव्हेंबर रोजी मतदान बुथावर रवाना झाले असून प्रशासनाने सज्ज केले आहेत.

कंधार तालुक्यात औरंगाबाद मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत प्रमुख पक्षासह एकूण ३५ उमेदवार आपला नशीब आजमावत आहेत.दि.१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी तालुक्यात एकुण ९ मतदान केंद्रावरून मतदान होणार असून ज्यात शहरातील

१) नंदकिशोर बिडवई कनिष्ठ महाविद्यालय(दक्षिण बाजु कें.क्र.
-३९४,म.संख्या ५१६),

२) प्रियदर्शिनी ज्यु.कॉ.(दक्षिण पुर्व बाजू कें.क्र.-३९५,म.संख्या ६७१),

३)श्री शिवाजी मा.व उ.मा.पानभोसी रोड (दक्षिण बाजु कें.क्र.३९६,म.संख्या ४०५),

तर ग्रामिण भागात

४) जि.प.कें.प्रा.शा.कुरूळा(कें.क्र.३९७,.म.संख्या ३७१.

५)जि.प.कें.प्रा.शा.दिग्रस(कें.क्र.३९८,म.संख्या ३७४),

६)जि.प.कें.प्रा.शा.उस्माननगर (कें.क्र.३९९,म.संख्या ४२९),

७)जि.प.कें.प्रा.
शा.पेठवडज(कें.क्र.४००,म.संख्या ३०५ ),

८)जि.प. कें.प्रा.शा.फुलवळ (कें.क्र.४०१,म.संख्या ६३६ ),

९)जि.प.कें.प्रा.शा.बारूळ (कें.क्र.४०२,
म.संख्या ४००) याप्रमाणे आहे.

उपविभागीय अधिकारी बोरगावकर,तहसिलदार मुंडे ,नायब तहसिलदार विजय चव्हाण ,
नयना कुलकर्णी
नायब तहसीलदार ,ताडेवार एस.व्ही,कर्मचारी श्रीनिवास ढगे,पी.आर.लखमावाड,उत्तम जोशी,बी.एल.अभंगे,एन.व्ही झिंके,एस.एस.राठोड,मन्मथ थोटे आदीसह कर्मचारी मतदान प्रक्रीया सुरळीत व्हावी यासाठी परीश्रम घेत आहेत.

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी कंधार तालुक्यात एकुण ९ मतदार केंद्रातून ४ हजार १४९ एवढे एकुण मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून मतदारांना मतदान करण्यासाठी कमीतकमी अडीच किमीच्या तर जास्तीत जास्त १० किमीच्या अंतरापेक्षा जास्त नसणार आहे.

औरंगाबाद(०५) मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या अंतर्गत लोहा(८८) अंतर्गत कंधार तालुक्यातील एकुण ९ मतदान केंद्रावर १ डिसेंबर रोजी मतदान होत असून या मतदानाचा निकाल दि.३ डिसेंबर रोजी या मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.

औरंगाबाद मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून एकूण ३५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

प्रतिक्रिया……

पदवीधर मतदारांनी आपले मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपले नाव कोणत्या मतदान केंद्रावर व कोणत्या अनु क्रमांकावर आहे हे पाहण्यासाठी महाराष्ट्र शासनाची https://ceo.maharashtra.gov.in/gtsearch1/ या वेबसाईटवर आपले पूर्ण नाव टाकून सर्च करावे असे आवाहन

                 नयना कुलकर्णी

नायब तहसीलदार निवडणूक विभाग कंधार यांनी केल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *