शाळेची घंटा
येत्या एक सप्टेंबरपासून
वाजणार म्हणे शाळेची घंटी
सांगत सुटला गावभर
शाळेत जाणारा छोटा बंटी
मुलाच्या गोंधळाविना शाळा
वाटू लागली होती भकास
झाडे झुडपे गवत वाढली
हिरवे दिसू लागली झकास
सर्वानाच लागली उत्सुकता
कधी सुरू होणार शाळा
कोरोनामुळे सारेच कंटाळले
पोटात आला होता गोळा
ऑनलाईन शिक्षणाने मुलांसह
आईबाबा झाले होते बेजार
मोबाईलच्या स्क्रीनिंगमुळे
मुलांना जडला होता आजार
बरे झाले एक गोड बातमी
सर्वाना ऐकायला मिळाली
घराघरांत पालकासह सारे
मुलं आनंदाने नाचू लागली.
– नासा येवतीकर, विषय शिक्षक,
कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड9423625769