भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाची विटबंना करणा-याचा शोध घेऊन तात्काळ अटक करा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाची विटबंना करणा-याचा शोध घेऊन तात्काळ अटक करा


कंधार ; साईनाथ मळगे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या माळेगाव (यात्रा) ता. लोहा जि. नांदेड येथे पुतळयाचीअज्ञात व्यक्तीकडुन विटबंना करण्यात आली आहे. त्यामुळे समाजामध्ये प्रचंड असंतोष व समाज बांधवाचीभावना दुखावल्या गेली असुन अश्या समाज द्रोही, राष्ट्रद्रोही, गुन्हेगारास अटक करुन कठोर कार्यवाहीकरावी अशी मागणी दि.६ रोजी तहसिलदार कंधार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
 जगभरातील करोडो लोकांची अस्मिता असणा-या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाची विटबंना केल्यामुळे तमाम लोकांच्या भावना दुखावल्याआहेत. जग आता एका भंयकर महामारीच्या संकटातुन जात असताना तमाम अनुयायीच्या भावनेला दुखावण्याचा प्रयत्न केला आहे .अश्या निश्चत प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कठोर शासन करावे.त्याला तात्काळ अटक करावी असे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर नगरसेवक विनोद पापीनवार ,मामा मित्र मंडळाचे संस्थापक मारोतीमामा गायकवाड ,राजकुमार केकाटे,मुन्नाभाऊ बसवंते ,सचिन बसवंते ,नागेश झगडे,राहुल सोनकांबळे ,जयकुमार कांबळे ,धम्मदीप वाघमारे ,अशिष गवळे,श्रीनिवास अदमाने ,सुदर्शन सोनकांबळे ,धम्मपाल वाघमारे ,राज पवार आदीच्या स्वाक्षरी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *