प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज दोन दिवस बंद

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज दोन दिवस बंद  


नांदेड ;नागोराव कुडके

नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज पुढील 2 दिवस म्हणजेच 6 व 7 ऑगस्ट 2020 रोजी  बंद ठेवण्यात येणार आहे. सर्व वाहनचालक-मालक व नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.  
नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयालयाचे तीन कर्मचारी कोव्हीड-19 विषाणु चाचणीमध्ये संक्रमित झाल्याचे आढळून आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा परिसर सॅनिटायझेशन करणे आदी बाबींसाठी हे कार्यालय दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, असेही प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कळविले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *