यांची मुख्य अभियंता महावितर यांच्याकडे मागणी
नांदेड; प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कृषी वीज पंपाना दिवसा वीज पुरवठा करावा असे लेखी निवेदन मुख्य अभियंता महावितरण परिमंडळ नांदेड यांना शिवराज्य युवा संघटनेच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले आहे .
राज्यात महावितरण कंपनीकडून कृषी वीज पंपांना रात्री अकरा वाजता वीज पुरवठा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतावर पाणी देण्यासाठी जावे लागत असल्यामुळे रात्री-बेरात्री शेतकऱ्यांना आपल्या जीवावर उदार होऊन शेतीला पाणी देण्याची वेळ आली आहे. राज्यात महावितरण कंपनीकडून कृषी वीज पंपांना रात्री वीज पुरवठा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा त्रास होत आहे अशा परिस्थितीत लाईट नसल्यामुळे . स्टेर्टर या डब्यातील फ्यूज टाकण्यास अडचणी येतात कधीकधी स्टेर्टर पेटीत वीजप्रवाह उतरण्याचा धोका शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही.
तसेच अंधारामुळे साप विंचू वगैरे यापासून पेटीत जवळपास व रस्त्यावर सतत धोका होत असतो असे कधी अंधारात वनप्राणी शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला करतात व अशा प्राणघातक हल्ल्याच्या देखील अनेक घटना डोळ्यासमोर घडलेल्या आहेत एखाद्यावेळेस रात्रीची वेळ असल्यामुळे अंधारामध्ये शेतकऱ्यांना वाट शोधण्याची वेळ येत असते नुकताच जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पळासखेडे या गाव शिवारात कृषी पंपा जवळ वीज प्रवाह उतरल्याने व अंधारात शेतकऱ्यांच्या लक्षात न आल्यामुळे एकाच दिवशी लागोपाठ जाधव कुटुंबातील तीन सख्ख्या भावाचा वीज प्रवाह उतरल्यामुळे शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला व संपूर्ण कुटुंबच पोरके झाले आहे.
शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळाला नसल्यामुळे वरील जाधव बंधू च्या. मृत्यूसमहावितरण कंपनी जबाबदार आहे व दिवसा वीजपुरवठा असला असता तर या तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला नसता अशा प्रकारच्या घटना यानंतर महाराष्ट्रामध्ये व नांदेड जिल्ह्यात घडू नये म्हणून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना पूर्ण दिवसभर वीज पुरवठा चालू करावा अशा प्रकारच्या घटना वारंवार घडू नये शेतकऱ्यावरील कुटुंबावर शोककळा पसरली व त्यांच्या कुटुंबाचा आधार महावितरण कंपनीने हिरावून घेऊ नये म्हणून कृषी वीज पंपांना तात्काळ दिवसा वीज पुरवठा करण्याचे नियोजन आखावे तसेच रात्रीच्या वेळेस ग्रामीण भागात ट्रान्सफॉर्म चा फ्युज गेल्यास रात्री वीज कंपनीचा कोणताही कर्मचारी ग्रामीण भागात उपलब्ध नसतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी वीज पंपांना रात्रीचा वीजपुरवठा नीट मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे यासाठी देशा कृषिप्रधान म्हणून शेतकऱ्याकडे पाहिले जाते व शेतकरीआखा देशाला जगवतो अशा शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीचा दिवस करून अन्न उत्पन्न करण्यासाठी धडपडत असतो या शेतकऱ्यांना वीज दिवसा पुरवठा का केला जात नाही ? नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ट्रांसफार्मर जळाल्यास ४८ तासाच्या आत दुरुस्ती किंवा बदलण्याची देखील व्यवस्था तात्काळ करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन शिवराज्य युवा संघटनेच्यावतीने मुख्य अभियंता महावितरण नांदेड यांना देण्यात आले आहे.
या निवेदनाची दखल न घेतल्यास यापुढे महावितरण कंपनीच्या विरोधात कायदेशीरपणे आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शिवराज्य युवा संघटना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा सज्जड इशारा देखील सदरील निवेदनात देण्यात आला आहे सदरील निवेदनावर विक्रम पाटील बामणीकर जिल्हाप्रमुख नांदेड प्रदीप पाटील हुंबाड जिल्हा प्रमुख नांदेड भाऊसाहेब पाटील चव्हाण तालुका प्रमुख शिवाजी पाटील शिंदे तालुका उपाध्यक्ष यांच्यासह अनेक शिवराज्य युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या दिलेल्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत