प्राथमिक शिक्षक ते विद्यावाचस्तपती होवून प्राचार्य पदावरुन सेवानिवृत्त असा शिक्षण प्रवास साधणारे — माजी प्राचार्य सुभाष नागपुर्णे

कंधार ; प्रतिनिधी

प्राथमिक शिक्षक ते डॉक्टरेट आणि थेट प्राचार्य पद भषवून विद्यार्थ्यांना आपला दागीना व दैवत मानत माजी खासदार व आमदार भाई डॉ .केशवराव धोंडगे ,माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे यांना
आदर्श मानुन मोठ्या जिद्दीने,कष्टाने आपल्या कार्याचा ठसा या मन्याड खोर्‍यातील जनमाणसात उमटविणारे माजी प्राचार्य सुभाष नागपुर्णे यांनी उमटविला.

मुळगाव अहमदपुर तालुक्यातील रोकडा सावरगाव असून त्यांना वर्ग पाचवीत असतांना ते सोडावे लागले .त्या नंतर हाळी येथे वास्तव्यास राहिले .त्यांच्या कार्याची हातोटी कमालीची होती.

चाळीस-बेचाळीस वर्षापूर्वी श्री शिवाजी विद्यालय दिग्रस(बु.) येथे प्राथमिक शिक्षक पदावर रजु होवून श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीत कंधार या संस्थेत आपल्या ज्ञान दानाच्या कार्याला आरंभ केला.विद्यार्थ्यांना दैवत मानुन सदा कामात व्यस्त राहील्यानेच त्यांना हे यश मिळवता आले.अशी प्रतीक्रीया माजी प्राचार्य सुभाष नागपुर्ण यांनी दिली.

आज दि.९ डिसेंबर २०२० रोजी सुभाष नागपूर्णे सरांचा वाढदिवस. त्यांना युगसाक्षी परीवारा कडून वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *