शेतकऱ्यांनी बांबू लागवड करून पृथ्वी चे रक्षण करणे काळाची गरज –माजी आमदार पाशा पटेल

पाशा पटेल यांनी साधला फुलवळ येथिल शेतकऱ्यांसोबत संवाद

फुलवळ; (धोंडीबा बोरगावे)

निसर्गाच्या बदलत्या संतुलनामुळे दिवसेंदिवस वातावरणात होत असलेले बदल आणि ऱ्हास रोखण्यासाठी पृथ्वी चे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आता बांबू लागवड करणे काळाची गरज असल्याचे कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष तथा मा. आ. पाशा पटेल यांनी दि.९ डिसेंबर रोजी कंधार तालुक्यातील फुलवळ येथील सदिच्छा भेट दिली असता ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आणि चर्चेदरम्यान पाशा पटेल यांनी उपस्थित ग्रामस्थ व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मत व्यक्त केले.

नांदेड येथे पत्रकार परिषद असल्याकारणाने आज पाशा पटेल हे जांब वरून फुलवळ मार्गे नांदेड ला जात असताना त्यांचे स्नेही माधवराव तेलंग यांच्या आग्रहाखातर चहा पाणी घेण्यासाठी फुलवळ येथे अर्धा तास थांबले होते. यावेळी माधवराव तेलंग सह माजी पंचायत समिती सदस्य माधवराव गित्ते , आनंदराव पवार , नारायणराव बोरगावे , पत्रकार धोंडीबा बोरगावे ,गोविंदराव मंगनाळे ,नवनाथ बनसोडे , नागेश सादलापुरे , शादुल शेख , अहेमद शेख , जे डी मंगनाळे , ग्यानोबा मंगनाळे , प्रकाश बसवंते आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना पाशा पटेल म्हणाले की , गेली काही वर्षांपासून निसर्गाचे संतुलन जवळजवळ बिघडत जात असल्याने शेती पिकांच्या उत्पादनात तर घट होतच आहे याचा आपण शेतकरी जवळून अनुभव घेत आहोत परंतु झपाट्याने होत असलेल्या वृक्ष तोडीमुळे वातावरणातील ऑक्सिजन चे प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणावर घटत आहे. तेंव्हा कमी पावसात आणि कमी श्रमात अधिक चे उत्पन्न तसेच जास्तीचा ऑक्सिजन देणारे म्हणून परिचित असलेले बांबू हे वृक्ष आहे. त्यामुळे दुहेरी फायद्याचा विचार करता बांबू ची लागवड ही अत्यंत महत्त्वाचे असून त्यासाठी लागणारा खर्च ही सामान्य शेतकऱ्यांना सोसणारा आहे तेंव्हा बांबूची लागवड करून पृथ्वी चे रक्षण करावे यासाठीच मी तळमळीने ठिकठिकाणी भेटी देत लोकांना माहिती सांगत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

एवढेच नाही तर आपण कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष असताना अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यास सरकार ला भाग पाडले आहेत त्यामुळेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असो का वरिष्ठ जाणकार राजकारणी मंडळी असो ते शेतकरी प्रश्नांच्यावेळी आवर्जून पाशा पटेल या नावाचा आवर्जून उल्लेख करत असतात असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *