“लाच देणे घेणे हे पाप आहे
भ्रष्टाचाराची हीच खरी सुरुवात आहे”
सध्याच्या स्थितीमध्ये भारतदेशाला भ्रष्टाचारासारख्या अनेक समस्यांनी ग्रासले आहे.भ्रष्टाचार हा संपूर्ण जगाला आणि देशाला भेडसवणारा सर्वांत मोठा गहन प्रश्न आहे.भारत देश म्हणजे सत्य,प्रामाणिकपणा,धार्मिकता,नैतिकमूल्ये आणि मानवतावादी विचारसरणीचा देश म्हणून ओळखला जातो.जगातील सुमारे पावणेदोनशे देशांमध्ये भ्रष्टाचारात भारताचा क्रमांक ९४लागतो.विसाव्या शतकाच्या अखेरीस आर्थिक महासत्ता बनण्याची स्वप्ने भारतातील तरुणाई पाहात असतांनाच भारत देशाची ओळख”सर्वाधिकभ्रष्ट”देश म्हणून होत आहे.९डिसेंंबर हा दिवस”आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार निषेध”दिवस म्हणून पाळला जातो.भ्रष्टाचार हा शब्द दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे.भ्रष्ट+आचार म्हणजे वाईट आचार.भ्रष्टाचार होण्यामाघे अनेक कारण आहेत उदा.लोभी वृत्ती,शिक्षणाचा अभाव.या कारणामूळे भ्रष्टाचाराला खतपाणी मीळते.कौटिल्य यांच्या अर्थशास्त्रामध्ये भ्रष्टाचाराचा उल्लेख आढळतो.
सध्याच्या स्थितीमध्ये भ्रष्टाचार हाच शिष्टाचार मानला जात आहे,कारण मानवाने पैसा हेच सर्वस्व मानले.भ्रष्टाचार मूक्त भारत हे प्रत्येक नागरीकाचे ध्येय असावे. तसेच हे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व तरुणांईचे सहकार्य असणे आवश्यक आहे,पण सर्वत्र बोकाळलेला भ्रष्टाचार रौद्ररुप धारण करतोय.या भ्रष्टाचाराचा हा भस्मासूर चिरडून टाकायचा असेल तर प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात करायला हवी.खर तर भ्रष्टाचार रोखणा-या सध्याच्या यंत्रणांनी त्यांची विश्वासर्हता गमावणं ही चिंतेची बाब आहे.त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कामकाजात पारदर्शकता आणून भ्रष्टाचार मोडून काढता येईल.वाढत्या भ्रष्टाचारामूळे माहागाईचे प्रमाण वरचेवर वाढत आहे.
आज भारतातील सर्वंच संस्थामध्ये भ्रष्टाचाराची पाळेमूळे खोलवर रुजलेली आहेत.उदा.आपल्या मुलांना नामांकित शाळेत दाखला द्यायचा असेल तर द्या डोनेशन,आपले अनाधिकृत बांधकाम अधिकृत दाखवायचे असेल तर महापालिकेच्या कर्मचा-यांना द्या चहापाण्याचा खर्च.कुठली शासकीय योजना आपल्या नावे करायची असल्यास द्या टेबलाखालून पैसै.हे सर्व पाहिल्यावर खुप राग येतो.प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार ,आणि भ्रष्टाचार.याला आळा घालण्याचा एकमेव उपाय म्हणजे कायद्याचे काटेकोर पणे पालन करणे.
आपल्याला खरच भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर आपण आपल्या घरापासून स्वत:पासून त्याची सुरुवात करणे आवश्यक आहे.औद्योगिकक्रांतीमुळेच सर्वच क्षेत्रात लक्षणीय परिवर्तन घडून आल.कमी कष्टात हातात भरपूर पैसे येऊ लागले त्यामूळे पैशाची हाव वाढली.”भ्रष्टाचार हाच शिष्टाचार”झाला त्यामूळे कुणीही काही बोलत नाही,याला एकमेव कारण म्हणजे”माणसाची उपभोगवादी वृत्ती”.आज आपण पाहातो उदघाटनाच्या दिवशीच पूल कोसळतो,कीती गंभीर बाब आहे ही, अन्नात भेसळ,मद्यात भेसळ,औषधात भेसळ यामूळे अनेकांचे प्राण जातात.भ्रष्टाचार हा एखाद्या आक्रमक” दहशतवाद्याप्रमाणे भासतो जो सामाजिक वातावरण ढवळून काढत आहे.आज महागाई मूळे जगण कठिण झालय.लोक अन्नासाठी तरसतात,दिवसभर कष्ट करुनही त्यांना एकवेळचे पोटभर अन्न मिळत नाही आणि एकीकडे अनेकांनी काळ्या पैशातून कमावलेली मालमत्ता पाहिली की डोळे विस्फरतात.हे सगळ थांबायला हवं.भारताचे सुजाण नागरिक म्हणून ठोस पावल उचलायला हवीत.देशाला बदलण्याची सुरुवात आपल्या स्वत:पासून करुया.तरच भ्रष्टाचारावर आळा बसेल.
जगाच्या नकाशावर भारताची स्वच्छ,सुंदर प्रतिमा निर्माण करण्यासाठी तरुणवर्गाने प्रयत्न करायला हवेत.ज्या ठिकाणी भ्रष्टाचार दृष्टीस पडेल तिथे आवाज उठवला पाहिजे,कायद्याचा आधार घेत भ्रष्टावर वार करता येईल.कारण कुठलाही सरकारी दाखला लगेच मीळणे हा आपला हक्क आहे.त्यासाठी लाच का द्यायची?या भ्रष्टाचार समस्येत सपूर्ण समाज भागीदार आहे.कारण लाच घेणे व लाच देणे यात दोघे ही बरोबरीचे असतात.शासकीय कामात परदर्शकता हवी तरच सामान्य जनतेला शासनाच्या कामाची पूर्ण माहिती मीळेल.भ्रष्टाचाराविषयी असलेले कायदे,कानून योग्यवेळी आमलात आणावे.एकजूटीने भ्रष्टाचाराची नांगी ठेचावी.तरच आपल्या भारतातून भ्रष्टाचार रुपी राक्षस नष्ट होईल.
“भ्रष्टाचाराने तर सारे क्षेत्रच
व्यापून टाकलय
पैशाच्या लोभापाई मानवाने
माणूसपणच विकून टाकलय”
रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१