कंधारात विविध आजारावर मोफत तपासणी शिबीराचे आयोजन


कंधार : हनमंत मुसळे


यश हाँस्पिटल आणि प्रसुतीगृह कंधार येथील डाँ. बालाजी कागणे व डाँ. सौ. संगीता बालाजी कागणे यांच्या वतीने भवानी नगर कंधार येथे दि. 10 डिसेंबर 2020 रोजी 10 ते 3 वाजेपर्यंत मुळव्याध, भंगदर, फिशर व गुदगत आजारावर मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.


कंधार शहरात व ग्रामीण भागातील रुग्णासाठी यश हाँस्पिटल अनेक दिवसापासून रुग्णाची सेवा बजावत आहेत. रुग्णाच्या सेवेसाठी दि. 10 डिसेंबर 2020 रोजी 10 ते 3 वाजेपर्यंत अनेक आजारावर मोफत शिबीर घेऊन रुग्णाची तपासणी करण्यात येणार आहे.
शहरातील व ग्रामीण भागातील रुग्णानी यश हाँस्पिटल व प्रसुतीगृह रुग्णालयात नाव नोंदणी करुन या शिबीराचा लाभ घ्यावा असे यश हाँस्पिटलचे डाँ. बालाजी कागणे व डाँ. सौ. संगीता बालाजी कागणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *