धर्मापुरी ( प्रा भगवान आमलापूरे)
येथील कै शं.गु,महाविद्यालयात रासेयो विभागाच्यावतीने महाविद्यालय परिसरात श्रमदान करण्यात आले. तत्पूर्वी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.टी.एल होळंबे तर प्रमुख पाहुणे म्हणून रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.एन. एस.चाटे उपस्थित होते.सुरुवातीला लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात डॉ.होळंबे यांनी त्यांचे मित्र डॉ. रामक्रष्ण बदने यांची ” आठवण लोकनेत्याची ” Remembering Gopinathrao Munde ही समाज माध्यमातून व्हायरल झालेली पोष्ट वाचून दाखवली.त्यानंतर साहेबांच्या संदर्भातील त्यांच्या स्वतःच्या आठवणींना उजाळा दिला.
अभिवादना नंतर महाविद्यालय परिसरात श्रमदान करण्यात आले. यात संस्थेचे सदस्य भागवतराव होळंबे आणि सर्व स्टाफ सहभागी झाला होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सानप यांनी तर आभार प्रा. गजलवार यांनी व्यक्त केले.