नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण
नांदेड ; सय्यद हबीब
जागतिक महामारी असलेल्या कोरोना विषाणूचा धोका सर्वसामान्यांसह नांदेड जिल्हयातील बडया राजकारण्यांना सुद्धा जाणवत असुन अशातच जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण झाली आहे . मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री चिखलीकर यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर याअगोदर प्रताप पाटील चिखलीकर यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांनाही कोरोनाची लागण झाली होती. तर दुसरीकडे , पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यांनंतर जिल्ह्यातील तीन काँग्रेस आमदारांनाही कोरोनाची लागण झाली . यातील नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी कोरोनावर मात केली तर आमदार तथा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर आणी आमदार माधव जवळगावकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.