अतिक्रमण व रहदारी हटवून मार्ग मोकळा करण्याची मागणी


कंधार,(प्रतिनिधी)

-कंधार तालुक्यातील मौ.पेठवडज येथील शिवाजी पुतळा व ग्रामपंचायत कार्यालया समोर अ‍ॅटो, जीप, टेम्पो, भाजीपाला वाले गाडे, मोटारसायकल पार्कींग व हॉटेल चालकांच्या खुर्च्या यासह अनेकांनी रोडवर अतिक्रमण केल्यामुळे एसटी बसला ये-जा करण्यासाठी मोठी कसरत होत असून हा मार्ग लवकरात लवकर मोकळा करून देण्याची मागणी व्यंकटी जाधव यांनी पोलीस अधिक्षक यांना निवेदनाद्वारे केली आहे.


मौ.पेठवडज ग्रामपंचायत कार्यालयासमोरच एसटी महामंडळाची बस नांदेड, कंधार, मुखेड मार्गाने प्रवाशी घेवून ये-जा करत असते. मात्र नेमके शिवाजी पुतळ्यासमोर बसला घेरा घेवून पुढे जावे लागते. याच जागी अवैध प्रवाशी अ‍ॅटोप, जीप, टेम्पो, भाजीपाला गाडे, नागरिकांच्या मोटारसायकली व हॉटेल चालकांनी आपल्या खुर्च्या रस्त्यावरच ठेवल्यामुळे बसला वळण घेताना त्रास होत आहे. यामुळे अपघातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदरील जागा मोकळी करून सर्वच वाहनधारक व प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे सदरील जागा मोकळी करून देण्याची मागणी व्यंकटी जाधव, पांडूरंग कंधारे, माधवराव वडजे, शरद गायकवाड, लोकडोबा गायकवाड यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी, तहसिलदार कंधार, गटविकास अधिकारी कंधार तथा संबंधीत अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *