कंधार (प्रतिनिधी)
एप्रिल ते डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून ग्रामपंचायतीसाठी प्रत्यक्ष मतदान दिनांक 15 जानेवारीला पार पडणार असल्याने लोहा, कंधार मतदार संघातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीनी गावात एकोपा टिकविण्यासाठी व आपसातील मतभेद टाळण्यासाठी व गावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ग्रामपंचायती बिनविरोध काढाव्यात असे आवाहन लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आ. शामसुंदर शिंदे यांनी केले आहे.
मतदारसंघातील ग्रामपंचायती बिनविरोध काढल्यास त्या बिनविरोध निघालेल्या ग्रामपंचायतींना आमदार निधीतून पाच लक्ष रुपये तात्काळ देण्यात येतील व शासनाचे पाच लक्ष असा एकूण दहा लक्ष रुपयांचा निधी बिनविरोध निघालेल्या ग्रामपंचायतींना मिळणार आहे, ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्याने गावांमध्ये शांतता व बंधुभावाचे सौहार्द कायम टिकून राहील व गावचा सर्वांगीण विकास होईल असेही आ. शामसुंदर शिंदे यांनी म्हटले आहे, कोरोना महामारी च्या संकटात व्यस्त असलेल्या प्रशासनावर चा ताणही कमी होणार आहे, गावा गावातील शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून मतदारसंघातील ग्रामपंचायती बिनविरोध काढून गावचा सर्वांगिन विकास साधण्याचे आवाहन आ. शिंदे यांनी केले आहे.
ज्या ग्रामपंचायती बिनविरोध निघतील त्या ग्रामपंचायतींना आमदार निधीतून तात्काळ पाच लक्ष रुपयांचा निधी दिला जाईल व बिनविरोध निघणाऱ्या ग्रामपंचायतींना येणाऱ्या काळात निधीची कसलीही कमतरता पडू देणार नसल्याचे ही आ. शामसुंदर शिंदे यांनी सांगितले.लोहा, कंधार मतदारसंघातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींनी ग्रामपंचायती बिनविरोध काढून गावचा विकास साधावा असे नम्र आवाहन लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आ. शामसुंदर शिंदे यांनी केले आहे.
लोहा ,कंधार मतदार संघातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती बिनविरोध काढाव्यात यासाठी या अगोदर ही कर्तव्यदक्ष आ. शामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी मतदारसंघातील अनेक गावातील पदाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा केलेली होती त्यास बऱ्याच ग्रामपंचायतीने बिनविरोध ग्रामपंचायती काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. शामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांना सांगितले होते.