जगात दूसरी नाही, माझी माय जिजाऊ !

जिजाऊ जयंती निमित्ताने..

राष्ट्रभक्तीची ज्वाला, माझी माय जिजाऊ
शत्रूवरती घाला, माझी माय जिजाऊ
आभाळाची छाया, माझी माय जिजाऊ
अन् रयतेवर माया, माझी माय जिजाऊ
जय जिजाऊ, जय जिजाऊ
जय जिजाऊ, जय जिजाऊ ||ध्रु||

ममतेचा बुलंद किल्ला
शोर्याचा प्रेमळ सल्ला
अन् मर्द मावळ्यासाठी
शिस्तीची हळवी काठी !
तलवारीचे पाते, माझी माय जिजाऊ
धरणीसोबत नाते, माझी माय जिजाऊ
जय जिजाऊ, जय जिजाऊ
जय जिजाऊ, जय जिजाऊ ||१||

जगण्याची जिवंत उर्मी
ही अस्सल मानवधर्मी
संस्कार असे जरतारी
बघ युगायुगांना भारी !
ही शिवबाची आई, माझी माय जिजाऊ
अन् जगात दुसरी नाही, माझी माय जिजाऊ !
जय जिजाऊ, जय जिजाऊ

जय जिजाऊ, जय जिजाऊ ||२||

ज्ञानेश वाकुडकर

ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
नागपूर २३/१२/२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *