मानव सेवा हीच ईश्वर सेवा समजून काम करणाऱ्या कोरोना योद्धांचा सन्मान -सौ.चित्ररेखा गोरे
कंधार
कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी,नागरीकांच्या आरोग्याची व सुरक्षेची काळजी घेताना नगरपरिषदेचे अधिकारी व सफाई कर्मचारी,आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी,पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी व पत्रकार बांधव आपल्या परिवाराची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पडणाऱ्या कोरोना योद्धांचा सन्मान भाजप महिला मोर्चाच्या वतीने दि.7 ऑगस्ट रोजी कंधार येथे करण्यात आला कंधार तालुक्यायील कोविड योद्ध्यांचे गौरव,रक्षाबंधन वृक्षारोपण निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक तथा भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा चित्राताई पाटील गोरे यांनी प्रतीपादन केले.या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून किसान मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे, उपनगराध्यक्ष म.जफरोद्दीन बाउद्दीन यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना गोरे म्हणाले ककोरोना काळात प्रार्थना स्थळे बंद होती पण नगरपरिषद,दवाखाने.पोलीस ठाणे,पत्रकारांचे नागरीकांना जनजागृती करणारे प्रसिद्धी माध्यमे चालू होते.अपऱ्या व्यवस्थेतही विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता शहर व परिसरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तन मन-धनाने प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.या साठी भाजप महिला मोर्चाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे ते म्हणाले.व या वेळी किसान मोर्च्या चे जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे यांनी विचार मांडले. तसेच मास्क व सिनिटायझर ही वाटप करण्यात आले यावेळी भाजपा महिला मोर्च्याचे जिल्हाध्यक्षा चित्ररेखा गोरे, कंधार नगरपरिषदे उपाध्यक्ष म.जफरोद्दीन बाउद्दीन,किसन मोर्च्या चे जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे,भाजपा शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार ,नगरसेवक सुनील कांबळे,उपाध्यक्ष सुनंदा वंजे, माजी नगरसेविका वंदना डुंमणे रमाबाई व्यवहारे, चेतन केंद्रे,मधुकर डांगे,राजहंस शाहपुरे,बालाजी तोटावाड,उमेश भुरेवार,शे.जलील,स.अमजद,म.जफर ,अड सागर डोंगरजकर आदी उपस्थित होते