डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची उर्वरित रक्कम तात्काळ विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी नांदेडच्या वतीने समाज कल्याण विभाग नांदेड येथे आज उपोषण करण्यात आले होते.या उपोषणाची दखल घेत नांदेड समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवतकर यांनी येत्या 15 जानेवारी पर्यंत उरर्वरीत रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले आहे. जर स्वाधार जमा झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी व सम्यक विध्यार्थी आंदोलनाच्या वतीने हजारो विध्यार्थ्यांना घेऊन नांदेड समाजकल्याण कार्यालयासमोर तीव्र,आक्रमक बोंबा मरो आंदोलन करण्यात येइल, असा इशारा बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.