नांदेड ; प्रतिनिधी
लॉयन्सचा डबा उपक्रमाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दि. 1 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता सर्व अन्नदाते आणि माध्यम प्रतिनिधींचा रयत रुग्णालय, सोमेश कॉलनी, नांदेड येथे सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलचे अध्यक्ष लॉ. संजय अग्रवाल व प्रोजेक्ट चेअरमन धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
रयत रुग्णालय येथे गेली दोन वर्ष लोकसहभागातून दररोज तीस डबे देण्यात आले. ज्या ज्या अन्नदात्यांनी लॉक डाऊन मध्ये तसेच रयत व श्रीगुरुजी रुग्णालयात डबे दिलेले आहेत त्यांचा लॉयन्सचे ज्येष्ठ पदाधिकारी सन्मान करणार आहेत. तसेच लॉयन्सचा डब्याची माहिती महाराष्ट्रभर देणाऱ्या माध्यम प्रतिनिधींचा देखील गौरव करण्यात येणार आहे. नूतन वर्षानिमित्त अल्पोहार ठेवण्यात आलेला आहे. वर्ष 2021 मध्ये रयत रुग्णालयात डबे देऊ इच्छिणाऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. दानशूर नागरिकांनी आपल्या परिवारातील सदस्यांच्या वाढदिवसानिमित्त अथवा दिवंगत नातेवाइकांच्या स्मरणार्थ एका दिवसाचे रुपये दीड हजार भरून नोंदणी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन झोनल चेअरमन लॉ.
डॉ. विजय भारतीया, लॉयन्स सेंट्रलचे सचिव लॉ.
उमेश मेगदे, कोषाध्यक्ष लॉ. सुनील साबू,लॉयन्स अन्नपूर्णाचे अध्यक्ष
लॉ.नागेश शेट्टी, सचिव लॉ.
धनराजसिंह ठाकूर, कोषाध्यक्ष लॉ. अनिल चिद्रावार व प्रोजेक्ट चेअरमन
लॉ.राजेशसिंह ठाकूर यांनी केले आहे.