कंधार ; प्रतिनीधी
माजी नगराध्यक्ष, काँग्रेसचे निष्ठावंत, अरविंदजी नळगे यांची आज माजी सैनिक संघटनेचे शिष्टमंडळांनी दि.१ जानेवारी २०२१ रोजी भेट घेऊन कंधार नगरपालीकेच्या हुतात्मा स्मारकातील गार्डनला कोणत्याही ऐका हुतात्मा चे नाव द्या म्हणुन विनंती निवेदनाद्वारे केली.
यावेळी नववर्षात देशाची सेवा करुन सेवानिवृत्त झालेले बहादुर माजी सैनिकांचा सन्मान करुन हुतात्मा स्मारका बाबत हुतात्म्याचे नाव देण्याची मागणीसाठी आलेल्या संघटना पदाधिकारी च्या शिष्टमंडळानी चर्चा केली व लवकरच सदरील प्रकरणी सर्वांच्या सहमतीने सदरील गार्डनला तालुक्यातील हुतात्म्याचे नाव देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले .
यावेळी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड,पोचिराम वाघमारे ,गोविंद सुर्यवंशी,माजी सैनिक कल्याणकर,माजी सैनिक देवकत्ते आदीसह माजी सैनिक उपस्थित होते.