अन्यथा उस्माननगर येथील बँकेला टाळे ठोकण्याचा इशारा
नांदेड ( प्रतिनिधी )
सध्या बँकाचा कारभार जनतेच्या हिताचा उरला नसून उस्माननगर महाराष्ट्र ग्रामीण बँकेत सध्या कोणत्याही कामासाठी लक्ष्मी चा वावर वाढला आहे लक्ष्मी द्या कामे करा अशी जणू संकल्पना बँकेने केली का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे . सध्या बँकेत शेतकऱ्या कडून पैसे घेऊन कामे करणाऱ्या दलालांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत आनागोदी कारभाराला सुरुवात झाली आहे.
या कारभारास मूकसंमती देणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण शाखा उस्माननगर चे शाखा अधिकारी यांना तात्काळ निलंबित करावे व उस्मानगर शाखेतून त्याची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी शिवराज्य युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर यांनी जिल्हाधिकारी व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
ग्रहक हेच बँकेचे दैवत हे गेल्या अनेक वर्षापासून बँकेला लागू होते परंतु सध्या आता हे ब्रीद लोक पावत चालले की काय ? अशी धारणा देखील जण माणसाची झालेली आहे उस्माननगर येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा असून या बँकेत जवळपास पाच ते आठ गावाच्या ग्रहकांचे खाते आहेत सध्याच्या युगात माणूस बँकेच्या निगडीत आला आहे शासनाने मानस व जनतेस बँकेशी जोडले आहे शासनाच्या अनेक योजना जनतेच्या हितासाठी बँकांना जोडल्या आहेत तशा सूचना दिल्या आहेत.
शेतकऱ्यांना कर्ज वाटप करणे पिक कर्ज सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज नोकरदारांना गृहकर्ज वैयक्तिक कर्ज महिला बचत गटांना कर्ज शेतकऱ्यांना शेतात घर बांधणे कर्ज अशा विविध योजनेअंतर्गत बँकांना कर्ज वाटप करणे बंद कारक केले असताना या सर्व नियमांची पायपली या बँकेत होत असताना दिसून येत आहे तेथील शाखा अधिकारी मनमानी कारभार करत आहेत कर्जासाठी शासनाने व बँकेने दिलेले नियम व अटी पूर्तता करून देखील कर्ज प्रकरणे मंजूर केले जात नाहीत.
कर्ज देणे बंधनकारक असताना या शाखा अधिकाऱ्यांना मात्र कुठेच भान राहत नाही शाखा अधिकारी यांनी सर्व नियमांना केराची टोपली दाखवली आहे या बँकेत ग्राहकांना कुठेच सुविधा दिल्या जात नाहीत शाखा अधिकाऱ्याकडून नेहमीच कुठल्याही कामाला टाळाटाळ केली जात आहे .
विशेष म्हणजे दलालामार्फत कर्ज प्रकरणे केले तर त्यावर तात्काळ शाखा अधिकारी अंमलबजावणी करतात हे मात्र उस्माननगर महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील शाखा अधिकाऱ्याचा मोठा नियम दलालांमार्फत घेतल्या जात आहे परंतु जन सामान्य लोकांचे प्रश्न हाताळताना त्यांच्याकडून न्याय मिळत नाही सध्या बँकेत खाजगी माणसाचा वावर म्हणजेच दलालांचा सुळसुळाट वाढलेला आहे.
त्यामुळे सामान्य जनतेची हेडसाळ होत आहे शेतकरी नोकरदार सुशिक्षित बेरोजगार महिला बचत गटाच्या महिला बँकेत व बँकेच्या दारात दररोज चक्र मारत आहेत त्यामुळे बँकेचे कुठलीच कामे वेळेवर होत नाहीत व प्रकरणे निकाली निघत नाहीत त्यामुळे संपूर्ण ग्राहकही वैतागले आहेत.
या बँकेत ग्राहकांची व शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत असताना दिसून येत आहे अशा उस्माननगर महाराष्ट्र ग्रामीण बँकाच्या शाखा अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करून या ठिकाणी सर्वसामान्य जनतेची व शेतकर्याची कामे करणाऱ्या अधिकार्याची नियुक्ती करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र ग्रामीण शाखा उस्माननगर बँकेला टाळे ठोकण्यात येईल असा गंभीर इशारा शिवराज्य युवा संघटनेच्या वतीने निवेदनात देण्यात आला आहे.
दलालांच्या तावडीतून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी व पैसे घेऊन काम करणाऱ्या बँक शाखा अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी व उस्माननगर महाराष्ट्र ग्रामीण बँक दलाला पासून कामे रून शेतकर्यांची लुबाडणूक करणाऱ्या दलालाला देखील शाखाधिकारी याप्रमाणे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात यावा असे निवेदन शिवराज्य युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर यांनी जिल्हाधिकारी व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.