कंधार ; प्रतिनिधी
धकाधकीच्या काळात तरुणांनी एक तास सायकलिंग व व्यायाम केल्यास आपल्या आरोग्यासाठी लाभदायी ठरणार असल्याने कंधार येथील हिट अँड फाईन कल्बने सायकलिंग सुरू केली असल्याची माहिती नगरसेवक शहाजी नळगे यांनी दिली व त्यांच्या क्लबने आगळ्या वेगळ्या पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत केले.
दरवर्षी प्रत्येक जण नवीन वर्षाचा वेगवेगळा संकल्प करत असतो. व्यवसाय ,शिक्षण ,नोकरी, व्यापार यामध्ये भरभराटी यावी म्हणून संकल्प केला जातो. मात्र कंधार येथील फिट आणि फाईन क्लबच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर, नांदेड जिल्ह्याचे कॅन्सर तज्ञ तथा कंधार चे भूमिपुत्र डॉक्टर आनंद भगत यांचा आदर्श घेऊन आपल्या आरोग्याला महत्त्व देत स्वतः फिट राहण्याचा संकल्प केला आहे .कंधारकरांनी देखील फिट राहावे असे आपल्या कृतीतून त्यांनी दाखवले आहे व नवीन वर्ष 2021 चे स्वागत वेगळ्या पद्धतीने केले आहे.
1 जानेवारी 2020 रोजी सुरू झालेल्या या उपक्रमासाठी नगरसेवक शहाजी नळगे ,डॉक्टर रामभाऊ तायडे ,गुत्तेदार सुनील सादलापुरे, डॉक्टर भगवान जाधव, डॉक्टर गजानन आंबेडकर ,कृष्णा चालीकवार , दिनेश व्यास, डॉक्टर स्वप्नील रणदीवे, भास्कर नळगे, प्रकाश नळगे, प्राध्यापक शंकर गीते, एडवोकेट अनिल डांगे, एडवोकेट नीरज कोळनुरकर,उदय पदमवार आदींनी सहभाग नोंदवला.