कंधार ; प्रतिनिधी
कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील पत्रे यांचा व वाहक चालक संघटनेचे नेते माधव कांबळे यांचा
दिनांक 1 जानेवारी 2021रोजी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कंधार शहरात वर्दीतील दर्दी माणूस म्हणून ओळख असणारे सर्वांचे मित्र सुनील पत्रे हे होत .covid-19 काळामध्ये आपल्या विविध कार्यातून माणुसकीचे दर्शन कंधारकरांना त्यांनी दाखवली आहे. तसेच सुनील पत्रे कंधार शहरातील विविध सामाजिक ,धार्मिक कार्यक्रमांमध्ये अग्रणी असतात. कंधार शहरातील कार्यकर्त्यांचे पोलीस मित्र म्हणून सुनील पत्रे यांची ओळख आहे.
चालक-वाहक संघटनेचे नेते माधव कांबळे यांच्याही वाढदिवसाच्या औचित्याने त्यांचा ही यावेळी सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष मिर्झा जामीन बेग, सचिव दिगांबर वाघमारे,भारतीय बौद्ध महासभेचे नामदेव कांबळे, जितेंद्र ढवळे , इम्रान शेख आदीची यावेळी उपस्थिती होती.