तालुक्यातील कुरुळा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ३ जानेवारी रोजी धम्मसंदेश व धम्मदान यात्रेचे आयोजन

कंधार ; प्रतिनिधी

कंधार – तालुक्यातील मौजे कुरुळा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ३ जानेवारी रोजी भंते पंय्याबोधी थेरो यांच्या नेतृत्वाखाली धम्मसंदेश व धम्मदान यात्रेचे पदार्पण होणार आहे.

या समारंभात धम्मरॅली, धम्मध्वजारोहण, धम्मसंदेश, धम्मदान, भोजनदान, धम्मदेसना, धम्मकाव्यमैफिल आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक पंडित ढवळे यांनी दिली.

ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खुरगाव नांदुसा ता. नांदेड संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने जिल्ह्यात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंतीच्या औचित्याने ३ जानेवारी पासून धम्मसंदेश व धम्मदान यात्रा काढण्यात आली आहे. त्यात पहिल्यांदा तालुक्यातील मौजे कुरुळा येथे यात्रेचे पदार्पण होणार आहे. यात श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख भदंत पंय्याबोधी थेरो यांच्यासह भंते मेत्तानंद, भंते संघरत्न, भंते चंद्रमणी, भंते धम्मकीर्ती, भंते सुदर्शन, भंते श्रद्धानंद, भंते संघप्रिय, भंते रोहन, भंते संजीव, भंते सुमंगल, भंते सुमेध, भंते अश्वजित, भंते शिलभद्र, भंते सदानंद, भंते सुगत, भंते सुजात आदी सहभागी होणार आहेत.

तरी कुरुळा व परिसरातील बौद्ध उपासक उपासिका यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने गंगाधर ढवळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *