फुलवळ ;(धोंडीबा बोरगावे)
मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा ६ जानेवारी हा जन्मदिवस सर्वत्र पत्रकार दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याच प्रमाणे कंधार तालुक्यातील फुलवळ मराठी पत्रकार संघानेही तो आज मोठ्या उत्साहात साजरा करून पत्रकारितेच्या जनकाला नम्रपूर्वक अभिवादन केले. याचवेळी फुलवळ ग्रामस्थांच्यावतीने सर्व पत्रकारांचा यथोचित सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला.
नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहिले पत्रकार भवन निर्माण केलेल्या फुलवळ पत्रकार संघाकडून हा पत्रकार दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या आयोजित सोहळ्यात प्रथमतः दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर फुलवळ ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा पुष्पहार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी भाषणं झाली . तसेच फुलवळ पत्रकार संघाकडून एकजुटीचा सामुदायिक संकल्प करत निर्भीड पत्रकारिता करतांना लेखणीच्या माध्यमातून वंचितांना न्याय मिळवून देत गाव व समाज विकासासाठी सकारात्मक बातम्या छापून लेखणीची धार कायम तेज ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचा संकल्प ही करण्यात आला .
यावेळी फुलवळ पत्रकार संघाचे अध्यक्ष धोंडीबा बोरगावे , पत्रकार मधुकर डांगे , पत्रकार विश्वाम्भर बसवंते , दत्ता डांगे , शादुल शेख आदी पत्रकारासह सागर मंगनाळे , आनंदा पवार , प्रवीण मंगनाळे , परमेश्वर मंगनाळे , संजय फुलवळे , चंदबस मंगनाळे , नागनाथ मंगनाळे , नवनाथ बनसोडे , कामाजी मंगनाळे , श्रीकांत मंगनाळे , धनंजय स्वामी , गजानन डांगे , उत्तम गोधने , बाळू फुलवळे , रहीम शेख आदींची उपस्थिती होती.