कंधार/प्रतिनिधी
तालुक्यातील नावंदयाचीवाडी येथील ग्रामपंचायतकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या ग्रामपंचायतीवर नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मर्गदर्शनाखाली बिनविरोध काढण्यात आली आहे. या ग्रामपंचायतीवर पुन्हा भाजपच्या झेंडा पडकवला आहे. नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्यांच्या खा.चिखलीकरांनी सत्कार केला.
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नावंदयाचीवाडी येथील पोलीस पाटील बालाजी केंद्रे यांच्या संकल्पनेतून बालाजी झुबाळ, तंटामुक्ती चे अध्यक्ष मधुकर गित्ते व गावकऱ्यांच्या सहकार्याने १५ वर्षा नंतर नावंदयाचीवाडी ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यात आली.
या ग्रामपंचायतवर पुन्हा भाजपच्या झेंडा पडकवला . या ग्रामपंचायतवर सरपंचपदाचे उमेदवार चाऊतराबाई नारायण मुंडे, कृष्णा संभाजी केंद्रे (उपसरपंच), सदस्यपदासाठी सौ.यशोदाबाई बालाजी गित्ते, सौ.धुरपताबाई मधुकर गित्ते,सौ. संगण्यानबाई बळीराम गायकवाड, सौ.सुमनबाई दत्ता तेलंगे, श्रीहरी नारायण मुंडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांच्या नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नांदेड येथे साईसदन निवासस्थानी सत्कार केला. या वेळी संभाजी केंद्रे, डॉ.संजय केंद्रे, रामराव केंद्रे, त्रिरोपती केंद्रे, माधव केंद्रे, राजहंस शहापुरे, भास्कर कडकेकर, या वेळी उपस्थित होते.