बरबडा अंतरगाव रुई रस्त्याचे काम चालू करा : विक्रम पाटील बामणीकर

यांची अधीक्षक अभियंत्याकडे मागणी

नांदेड प्रतिनिधी
नायगाव तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा रस्ता असलेला बरबडा अंतरगाव रुई या रस्त्याच्या कामाची सुरुवात एक वर्षा अगोदर करण्यात आली वर्षभरात फक्त रस्ता सर्वत्र खोदून ठेवून रस्त्याच्या बाजूला गिटीचे ठिका ठिकाणी ढगारे टाकण्यात आले पण रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात न झाल्यामुळे रस्त्यावरून प्रवास करण्यास नागरिकांना अत्यंत अडचणीचा सामना करून आपला जीव मोठी मध्ये धरून या रस्त्यावरून प्रवास करण्याची वेळ या परिसरातील नागरिकांना आली आहे त्यातच आता शाळेला सुरुवात झाल्यामुळे विद्यार्थ्यांना देखील पायी चालणे कठीण झाले आहे .

कारण रस्त्याच्या बाजूला गिटिचे ढिगारे फोडून ठेवल्यामुळे व संपूर्ण रस्ता खोदून ठेवण्यात आलेला आहे याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळ लक्ष देत नसल्यामुळे गुत्तेदाराची मनमानी कारभार चालत असल्याचे दिसून येत आहे त्यासाठी शिवराज्य युवा संघटनेच्या वतीने अधीक्षक अभियंता साहेब सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे बरबडा अंतरगाव रुई या रस्त्याच्या कामाची तात्काळ सुरुवात करण्यात यावी व या रस्त्याचे काम लवकरात पूर्ण करण्यात यावे अन्यथा शिवराज्य युवा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा विक्रम पाटील बामणीकर जिल्हा प्रमुख यांनी दिला आहे .

अंतरगाव मनुर इज्जतगाव या परिसरातील जनतेला रस्त्या अभावी मरण यातना सोसाव्या लागत आहेत गेल्या पंधरा वर्षापासून बरबडा अंतरगाव रुई हा रस्ता अत्यंत खराब व रस्त्याची दयनीय अवस्था झाली असल्यामुळे प्रत्यक्षात रस्त्याचे काम चालू झाल्यामुळे या परिसरातील जनतेच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद दिसत होता पण गेल्या एक वर्षभरापासून या रस्त्यावर फक्त गिट्टी फोडून ठेवण्यात आली आहे व रस्तादेखील खोदून ठेवण्यात आला आहे पण पुढे काम चालू करण्यात आले नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांना पुन्हा एकदा रस्त्या अभावी मरण यातना सोसण्याची वेळ आली आहे.

त्यामुळे या भागातील एकांदा पेशंट जर बीमार असेल तर त्यांना वेळेवर दवाखान्यात देखील पोहोचता येत नाही एवढा खराब रस्ता झाला असल्यामुळे या रस्त्यावरून दोन चाकी वाहन देखील चालवणे म्हणजे तारेवरची कसरत व जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून प्रवास करावे लागत आहे त्यासाठी हा रस्ता तात्काळ व रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात यावी अन्यथा शिवराज्य युवा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे निवेदन अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड यांना देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनावर विक्रम पाटील बामणीकर जिल्हाप्रमुख नांदेड भाऊसाहेब पाटील चव्हाण तालुकाप्रमुख नायगाव यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *