जिल्ह्यातील विकास कामांना गती देणार – खा. प्रतापराव पाटील चिखलीकर


कंधार ; दिगांबर वाघमारे


नांदेड जिल्ह्यात सत्तर वर्षाच्या कार्यकाळात एक ही राष्ट्रीय महामार्ग कांग्रेसला आणता आले नाही. भाजपची सत्ता केंद्रामध्ये आल्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने नांदेड जिल्हासह राज्यातील रस्त्यांचे अनुशेष भरून काढन्यात आले. जिल्ह्याला जोडणारे शेकडो किमी चे रस्ते प्रगती पथावर आहे. कोविड-१९ कोरोनाच्या कार्यकाळात विकास कामना ब्रेक लागले होता. नवीन वर्षात कोरोना मुक्त संकल्प करून जिल्ह्यातील रखडलेल्या विकास कामांना गती देणार असल्याची माहिती युगसाक्षी व पत्रकारा’शी’ हितगूज करतांना नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली.


नवीन वर्षाच्या निमित्ताने खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंग व शिक्षक सेनेच्या वतीने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा सत्कार कण्यात आला या वेळी ते बोलत होते. पुढे बोलताना चिखलीकर म्हणाले की राज्यात रस्त्यांची अवस्था अत्यंत दैनी झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ता असे चित्र सर्वत्र निर्माण झाले आहे. रस्ते दुरुस्त न करता दुसऱ्याकडे बोट दाखवण्याचे काम राज्य शासन करीत आहे. लातूर, नांदेड ते वरंगा हा रस्ता कोरोनाच्या महासंकटामुळे रखळला होता आता लातूर ते लोहा रस्ता दुरुस्ती चे काम प्रगती पथावर आहे. गेल्या पन्नास वर्षा पासून राखलेले नांदेड ते बिदर हा रेल्वे मार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मंजूर केला. ही नांदेड जिह्यासाठी अभिमानाची बाब आहे असे चिखलीकर म्हणाले. या रेल्वे मार्गासाठी २ हजार पाचशे ५२ कोटी रुपयांची तरतूद केंद्र शासनाने केली. मी नुकताच रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी व्हीसी द्वारे चर्चा केली. भूसंपादनाची काम सुरू करण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.


केंद्र शासनाच्या संबंधित असलेली कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यातील जनतेने माझ्या सारख्या लहान कार्यकत्याला देशातील सर्वच मोठी सभागृहात पाठवले.मी जनतेचे ऋण कधीही विसरणार नाही असे खा.चिखलीकर म्हणाले. या वेळी मुख्याध्यापक राजहंस शहापुरे, महासंगाचे विभागीय सचिव हरीहर चिवडे, महांगाचे तालुका अध्यक्ष भास्कर पाटील कळकेकर, दिगंबर वाघमारे, मंजूर अहेमद, मोहम्मद अन्सारोद्दीन, श्री.महाजन, डॉ.संजय केंद्रे, रामराव केंद्रे, त्रिरोपती केंद्रे, माधव केंद्रे, यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Video News******

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *