कंधार ; मो.सिकंदर
कंधार शहरातील २५ लाख ३१ हजार रुपये किमतीच्या रस्त्याच्या विकास कामाचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आले. आज दिनांक ७ जानेवारी रोजी नगरपरिषद हद्दीतील बमखाजा दर्गाह पासून ते नवा मारोती मंदिर पर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे बांधकामाचे शुभारंभ मा. नगराध्यक्ष अरविंद नळगे व माजी उपनगराध्यक्ष बबर मोहम्मद यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत भुमी पुजन शुभ करून शुभारंभ करण्यात आले.
गेल्या एक ते दोन महिन्या पुर्वी सदर कामाची निविदा सोडून वर्कऑर्डर झाले होते.परंतु राज्यातील पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची आचार संहिता लागू असल्याने या कामाचे शुभारंभ होऊ शकले नसल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे. यावेळी मा नगराध्यक्ष अरविंद नळगे यांनी लवकरच कंधार शहरातील सर्व विकास कामे सुरू होतील असे. मी दिलेला शब्द पूर्ण करेल असेही यावेळी त्यांनी बोलून दाखवले.
यावेळी नगरसेवक मंन्नान चौधरी,मा.उपाध्यक्ष हमीद सुलेमान,अजीमोद्दीन बबर मोहम्मद,मगदुम कुरेशी,शेख मुजिब,शेख खालेद,सय्यद सलीम,सय्यद मियां,अब्दुल सुलतान,शेख खैसर सह स्थानिक नागरिक उपस्थित होते.