कंधार ; मो.सिकंदर
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने कंधार येथे दर्पण दिन साजरा करण्यात आला.यावेळी जिल्हा सहसचिव दिगंबर वाघमारे यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले की, पत्रकार हा समाजाचा आरसा असून तळागाळातील सर्वसामान्य घटकातील उपेक्षितांना न्याय देण्याचे काम पत्रकारांच्या लेखणीतून झाले पाहिजे.असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
दिनांक ६ जानेवारी रोजी कंधार येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या संपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून. दर्पण दिनाच्या सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा देण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून दिगंबर वाघमारे जिल्हा सहसचिव बोलत होते ते पुढे म्हणाले की, पत्रकारांनी आपल्या स्वतः मध्ये अपडेट करण्याची सुधारणा कराव्या व एकमेकांचे प्रश्न सोडविण्याची तळमळ ठेवावी एकमेका साहाय्य करू या उक्तीप्रमाणे सर्वांनी समाज हित जोपासावे असे आव्हान यावेळी त्यांनी केले.
कार्यक्रमास पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष मिर्झा जामीर बेग यांनी सर्व पत्रकार संघातील सदस्यांचा सत्कार करून दर्पण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी दिगंबर वाघमारे ,मिर्झा जमिर बेग,प्रा. भागवत गोरे, प्रा. सुभाष वाघमारे, माधव भालेराव हनमंत मुसळे,एस.पि.केंद्रे, डॉ.माधव कुद्रे, मोहम्मद सिकंदर यांच्यासह सदस्यांची व पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.