एलआयसी एजेंट संभाजी गजभारे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन!

नांदेड ; प्रतिनिधी

नांदेड शहरातील एलआयसी एजेंट तथा नालंदा नगर येथील रहिवाशी “श्री.संभाजी तुकाराम गजभारे” यांचे रविवारी दि. १० जानेवारी २०२१ रोजी दुपारी 4 वाजता हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे. मृत्यू समयी त्यांचे वय वर्ष 62 होते.

त्यांच्या पश्चात पत्नी 3 मुले, एक मुलगी, सुना – जावई नातूं-नातवंडे असा परिवार आहे. गजभारे यांची ओळख अत्यंत शांत, मनमिळाऊ व्यक्तमत्व अशी होती, त्यांनी नांदेड शहरातील अनेक नागरिकांच्या एलआयसी काढुन अर्थ सहाय्य केले होते. त्यांच्या अश्या अचानक जाण्याने गजभारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर नालंदा नगर व शहर वासियांनामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
गजभारे यांचा अंत्यविधी सोमवार दि. ११ जानेवारी २०२१ रोजी सकाळी १० : ०० वाजता, त्यांचे राहते घर नालंदा नगर नांदेड येथून निघणार आहे व शांतीधाम नांदेड येथे होणार आहे.

#nanded #नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *