नांदेड दि. 14
जिल्ह्यातील 907 ग्रामपंचायतीसाठी होणाऱ्या निवडणुकांची जिल्हा प्रशासनातर्फे संपुर्ण तयारी झाली असून याअनुषंगाने आवश्यक असलेल्या सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर रैयांनी दिली. या निवडणुका खेळीमेळीच्या आणि सौहार्दपुर्ण वातावरणात व्हाव्यात यासाठी त्यांनी आवाहन केले असून मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदान करावे असे सांगितले.
सोळा तालुक्यातील एकूण 1 हजार 13 ग्रामपंचायतीसाठी निवडणूका कार्यक्रम जाहिर झाला होता. यापैकी 106 ग्रामपंचायती बिनविरोध आल्याने 907 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. यासाठी एकूण 2 हजार 853 मतदार केंद्र तयार करण्यात आले असून सुमारे 11 हजार 412 शासकीय कर्मचारी व निवडणूक अधिकारी यासाठी जबाबदारी पार पाडतील. जिल्ह्यात एकूण 13 लाख 21 हजार 296 मतदार या निवडणूकीत आपला हक्क बजावणार असून यात 6 लाख 32 हजार 138 महिला मतदार तर 6 लाख 89 हजार 146 पुरुष मतदार मतदान करणार आहेत.