कंधार ; प्रतिनिधी
नृत्य परिषद महाराष्ट्र राज्य पुणे या संघटनेच्या कंधार तालुका उपाध्यक्षपदी कंधार येथील नृत्यकलाकार दयानंद वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यात नृत्य परीषदेची नुतन कार्यकारणी निवड करण्यात येत असून सदरील निवडीतुन कंधार तालुक्यात नृत्य कलाकारांचे संघटन करुन त्यांचे प्रश्न नृत्य परिषदेच्या ध्येय धोरणानुसार नृत्य कलाकारांना योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी दयानंद वाघमारे यांना देण्यात आली असून सन 2020 ते 2023 या कालावधीत नृत्य परीषदेचे काम पाहण्याचे नियुक्ती पत्र नांदेड जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल निवडंगे यांनी दिले आहे.या निवडी बद्दल दयानंद वाघमारे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.